मद्य घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा ; निर्दोष मुक्तता
Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्यासह 23 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासह या प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची देखील निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत. सीबीआयकडे त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत.
आज सकाळी दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी सुनावणीसाठी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि सिसोदिया (Manish Sisodia) राऊस अव्हेन्यू न्यायालयात पोहोचले होते. तर इतर आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष सोडताना म्हटले आहे की, उत्पादन शुल्क धोरणात कोणताही मोठा कट किंवा गुन्हेगारी हेतू नव्हता. यासह, न्यायालयाने उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व 23 आरोपींविरुद्ध सीबीआय खटला बंद केला आहे.
Delhi Court discharges Arvind Kejriwal and Manish Sisodia in the corruption case related to alleged liquor policy scam.
Court raps CBI for implicating them without any material, says voluminous chargesheet has many lacunae not supported by any witness or statement.… pic.twitter.com/vdzGPJNkM4
— Live Law (@LiveLawIndia) February 27, 2026
सीबीआयला फटकारले
सुनावणीदरम्यान, विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी सीबीआयला त्यांच्या तपासाबद्दल फटकारले. आरोपपत्रात अनेक त्रुटी आहेत ज्या साक्षीदारांनी किंवा जबाबांनी समर्थित नाहीत. प्रथमदर्शनी, कोणताही खटला दाखल झाला नाही. निष्पक्ष खटल्यासाठी निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे, परंतु या प्रकरणात असे आढळून आले नाही असं म्हणत न्यायालायने सीबीआयला फटकारले.
नेमकं प्रकरण काय?
सीबीआयने 2022-23 दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते, ज्यात स्वतः अरविंद केजरीवाल यांचाही समावेश होता, ज्यांनी सहा महिने तुरुंगवास भोगला होता. साउथ ग्रुप नावाच्या लॉबीने परवाना शुल्क माफी आणि इतर फायद्यांच्या बदल्यात 100 कोटीची केजरीवालाने लाच घेतली असा आरोप सीबीआय आणि ईडीने केला होता.
पाकिस्तान – अफगाणिस्तान युद्धात इराणची एन्ट्री; दिली मोठी ऑफर –
