मोठी बातमी : सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आक्षेप; ज्येष्ठ नेत्याने वकिलांमार्फत नोटीस धाडली

Sunetra Pawar: पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • Written By: Published:
Sunetra Pawar

नवी दिल्ली : नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता या अध्यक्षपदाला पक्षातून आक्षेप घेण्यात आला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह (Sachchidanand Singh) यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. पक्षाच्या अध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांना 9 जुलै रोजी नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांनी नोटीशीमध्ये काही मुद्दे उपस्थित केले आहेत. सर्व अधिकार प्रफुल्ल पटेल यांना होते. तर बैठक का बोलविण्यात आली आहे. अध्यक्ष निवड पुन्हा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.


अध्यक्षपदाच्या निवडीला कोणते आक्षेप ?

28 जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2026 ला निवडणूक आयोगाला पक्षाकडून सुधारित घटना देण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपदाचे अधिकार असतील असे नमूद करण्यात आले होते. सुधारित संविधानानुसार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेलांना सर्वाधिक होते. त्यानुसार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक प्रफुल पटेल यांनी बोलवणे गरजेचे होते. मग पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहबन श्रीवास्तवांनी कोणत्या अधिकारात कार्यकारणीची बैठक बोलावली ? राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 26 फेब्रुवारीला बोलविण्यासाठी 18 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. त्यावर तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड हा मोठा प्रश्न आहे, असे सच्चिदानंद सिंह यांनी नोटीसीमध्ये म्हटले आहे.

गेल्या वर्षीचा लाल किल्ल्याजवळचा बॉम्बस्फोट…..11 जणांवर अंत्यसंस्काराला न्यायालयाने दिली परवानगी !

सच्चिदानंद सिंह कोण आहेत ?
सच्चिदानंद सिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव राहिले आहेत. आता ते झारखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.

क्रिकेटच्या पंढरीत भारताच्या पोरींची कमाल; लॉर्ड्सवर जिंकला पहिला महिला कसोटी सामना


कायद्याच्या चौकटीत राहून निवड: प्रवक्ते सूरज चव्हाण

याबाबत सूरज चव्हाण पक्षाचे प्रवक्ते म्हणाले, सुनेत्रा पवार यांची निवड निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या कायद्यानुसार आणि पक्षाच्या घटनेनुसार झाली आहे. वरळी येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत हातवर करून सगळ्यांना प्रस्ताव ठेवून अनुमोदन दिले आहे. एकमताने त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झाली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही निवड केली आहे. ही नोटीस जाणीवपूर्वक माध्यमात चर्चेत येण्यासाठी केली आहे.

follow us