क्रिकेटच्या पंढरीत भारताच्या पोरींची कमाल; लॉर्ड्सवर जिंकला पहिला महिला कसोटी सामना

Indian Women Team इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात महिला भारतीय संघाने २७० धावांनी धावांनी विजय मिळवला आहे

  • Written By: Published:
Letsupp Image   2026 07 13T175252.329

India Women Beat England Women In Historic Lords Test Match : भारतीय महिला क्रिकेट संघाने लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा सहज पराभव करत, ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला महिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे. क्रिकेटचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारताने यजमान इंग्लंडला 270 धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला. 

पहिल्या डावात 115 धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर, भारतीय संघाने आपला दुसरा डाव 341 धावांवर घोषित केला. 457 धावांचे लक्ष्य गाठताना  तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ केवळ 59 धावांत पाच गडी गमावले. एमी जोन्स आणि सोफी एक्लेस्टोन यांनी अर्धशतके झळकावून इंग्लिश संघाच्या आशा जिवंत ठेवल्या, पण अखेरीस तो संघ केवळ 186 धावाच करू शकला.

दुसऱ्या डावामध्ये स्मृती मानधनाने ७० धावा केल्या होत्या. यास्तिका भाटिया हिने 158 चेंडूत 113 धावा करत लॉर्ड्स मैदानावर पहिले शतक ठरणारी जगातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर रिचा घोषने 50 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा 200 धावांचा टप्पाही पार करून दिला नाही. इंग्लंडला 186 धावांवर ऑल आऊट करत विजय मिळवला. इंग्लंडकडून एमी जोन्स 54 धावा, सोफी एक्लेस्टोनन 50 धावा करत झुंज दिली. भारताकडून स्नेह राणाने 4, क्रांती गौड 2 विकेट तर, सायली सातघरे आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

भारतीय मुलींनी बदला घेतला

भारताचा पुरुष संघही सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-20 मालिका 0-4 ने हरला. मात्र, भारताच्या महिला संघाने लॉर्ड्सवर पहिला कसोटी सामना 270 धावांनी जिंकून पुरुष संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. 

142 वर्षांनंतर ‘ऐतिहासिक’ विजय

खरं तर, लॉर्ड्सवर पहिला क्रिकेट सामना 1884 साली खेळला गेला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या पुरुष संघांमधील त्या सामन्यानंतर 142 वर्षांनी लॉर्ड्सवर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या संघाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. 

follow us