IPL 2027 Auction : 1,220 खेळाडूंची नोंदणी; ‘या’ दिवशी होणार IPL 2027 साठी मिनी लिलाव

IPL 2027 Auction : आयपीएल 2027 साठी सर्व संघांच्या रिटेन्शन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर आता आयपीएल 2027 साठी

  • shakir sayyad
  • Written By: Published:
IPL 2027 Auction

IPL 2027 Auction : आयपीएल 2027 साठी सर्व संघांच्या रिटेन्शन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर आता आयपीएल 2027 साठी मिनी लिलाव होणार आहे. गोव्यात होणाऱ्या या मिनी लिलावासाठी 1220 खेळाडूंनी नोंदणी केली असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या या लिलावात 14 ‘कॅप्ड’ (आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले) भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. बेन स्टोक्सनेही या लिलावासाठी आपले नाव नोंदवले आहे.

IPL लिलावासाठी खेळाडूंची नोंदणी

‘क्रिकइन्फो’च्या अहवालानुसार, आयपीएल लिलावासाठी 1,220 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये 14 ‘कॅप्ड’ भारतीय खेळाडू आणि 170  ‘कॅप्ड’ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ‘कॅप्ड’ भारतीय खेळाडूंच्या यादीत आवेश खान, दीपक चहर, आकाश दीप, जयदेव उनाडकट, दीपक हुड्डा, करुण नायर, कुलदीप सेन, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, सारांश जैन, शिवम मावी, तुषार देशपांडे, उमेश यादव आणि उमरान मलिक यांचा समावेश आहे.

एकूण खेळाडू: 1,220
‘कॅप्ड’ भारतीय: 14
‘कॅप्ड’ आंतरराष्ट्रीय: 170
असोसिएट (सहयोगी) देशांचे खेळाडू: 42
‘अनकॅप्ड’ (आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेले) भारतीय: 925
‘अनकॅप्ड’ आंतरराष्ट्रीय: 69

या यादीत ‘फुल मेंबर’ (पूर्ण सदस्य) देशांमधील 184 खेळाडू आणि ‘असोसिएट’ देशांमधील 42 खेळाडूंचा समावेश आहे. जपानचे बेंजामिन इटो-डेव्हिस आणि चार्ली हारा-हेन्जी यांनीही लिलावासाठी नोंदणी केली आहे.तर दुसरीकडे बांगलादेशच्या एकूण 11 खेळाडूंनी लिलावासाठी आपली नावे नोंदवली आहेत. या यादीत हसन महमूद, परवेझ हुसेन इमोन, रिपन मंडल, रिशाद हुसेन, सैफ हसन, शकी महेदी हसन, शमीम हुसेन, शरीफुल इस्लाम, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद आणि तौहीद हृदोय यांचा समावेश आहे.

खरेदीदारांना दिलासा, सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर-

आयपीएल 2027 लिलावापूर्वी खेळाडूंची निवड प्रक्रिया

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी 1,220 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली असली, तरी त्या सर्वांची निवड होणार नाही. या खेळाडूंची संपूर्ण यादी सर्व संघांना (फ्रँचायझींना) दिली जाईल आणि ज्या खेळाडूंमध्ये फ्रँचायझी रस दाखवतील, त्यांनाच लिलावासाठी पात्र ठरवले जाईल. हा एक ‘मिनी-लिलाव’ असल्याने, 1,220 खेळाडूंपैकी केवळ 250 ते 300 खेळाडूंची निवड होण्याची शक्यता आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची अंतिम यादी 1 डिसेंबरपर्यंत जाहीर केली जाईल. या यादीत आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या (अनकॅप्ड) भारतीय खेळाडूंची संख्या सर्वाधिक आहे.

follow us