अफेअरच्या वादामुळे CEO पदाचा राजीनामा, 11 दिवसांत घरवापसी; तरीही जेन्सेन हुआंग यांच्या पुनरागमनाने शेअर बाजारात मोठी उसळी!
Jensen Huang Nvidia CEO: एनव्हिडियाचे CEO जेन्सेन हुआंग यांच्या पुनरागमनानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली.
Jensen Huang Nvidia CEO: जगातील आघाडीची चिपनिर्मिती कंपनी एनव्हिडिया (Nvidia) चे CEO जेन्सेन हुआंग यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे मोठा वाद निर्माण झाला. या वादानंतर त्यांनी CEO पदाचा राजीनामा दिला. मात्र, अवघ्या 11 दिवसांत त्यांनी पुन्हा पदाची सूत्रे हाती घेतली. विशेष म्हणजे, त्यांच्या पुनरागमनानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली.
एसटीच्या NCMC कार्डबाबत मोठा निर्णय! आता 50 रुपयांची अट संपली, फक्त 5 रुपयांतही करता येणार रिचार्ज
अफेअरच्या चर्चेमुळे खुर्ची धोक्यात
‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, हुआंग यांचे ॲलिस हुआंग नावाच्या महिलेसोबत कथित संबंध होते. त्यांचे चीन सरकारशी संबंध असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. याशिवाय कंपनीतील एका महिला वरिष्ठ अधिकाऱ्यासोबतही त्यांचे संबंध असल्याची चर्चा होती. या प्रकरणांमुळे कंपनीच्या संचालक मंडळात चर्चा झाली. त्यानंतर 12 नोव्हेंबरला हुआंग यांनी CEO पदाचा राजीनामा दिला.
11 दिवसांत घरवापसी, शेअर्समध्ये 31.5 टक्क्यांची वाढ
23 नोव्हेंबरला हुआंग यांनी पुन्हा CEO पदाची सूत्रे हाती घेतली. कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी, “दुसऱ्या कार्यकाळात मी एक अधिक चांगला CEO ठरेन,” असं म्हटलं.
त्यांच्या पुनरागमनाचा परिणाम शेअर बाजारात दिसला. एनव्हिडियाचे शेअर्स तब्बल 31.5 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे कंपनीच्या बाजारमूल्यात जवळपास 1 ट्रिलियन डॉलरची भर पडली. हुआंग यांच्या संपत्तीतही मोठी वाढ झाली. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, त्यांची संपत्ती जवळपास 144 अब्ज डॉलरवर पोहोचली असून ते जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 13 व्या क्रमांकावर आले.
AI क्षेत्रात हुआंग यांचं महत्त्व
हुआंग यांच्या नेतृत्वाखाली एनव्हिडियाने गेमिंग चिप्सपासून AI क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीपर्यंत मजल मारली आहे. कंपनीच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली होती. आता त्यांच्या पुनरागमनामुळे शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. मात्र, त्यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांचा वाद अद्याप चर्चेत आहे.