राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा जलवा दिसला : 78 % स्ट्राईक रेट
karnatak asembly election update 2023 : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Legislative Assembly) 224 जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज सुरूवात झाली. संपूर्ण देशाचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल करण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा आहे. यंदाही कर्नाटकने आपली परंपरा कायम राखल्याचं हाती आलेल्या निकालावरून दिसतं आहे. मतमोजणीच्या सध्याच्या आकडीवारीवरून कॉंग्रेस (Congress) आघाडीवर असल्याचं दिसतं. याचं श्रेय जातं राहुल गांधीना. 51 विधानसभा मतदारसंघात राहुल गांधींची (Rahul Gandhi’s) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra)गेली होती, त्यातील 38 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे.
राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला कर्नाटकात चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचा परिणाम कर्नाटक निवडणुकीच्या निकालात दिसून आला आहे. राहुल गांधी यांनी मोदी यांच्या विरोधात कर्नाटकात गेल्या निवडणुकीत वक्तव्य केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे राहुल यांना खासदारकी गमवावी लागली होती. खासदारकी गमवल्यानंतर राहुल यांनी कर्नाटकात जोरदार प्रचार केला. त्यांच्या सभांनाही कर्नाटकात चांगला प्रतिसाद मिळाला.
Karnataka Election Result : निवडणूक आयोगाच्या ट्रेंडमध्येही काँग्रेसला बहुमत, भाजपसह जेडीएसलाही झटका
भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते उत्साही झाले होते. काँग्रेसने यात्रा संपल्यानंतर लगेचच निवडणुकीची तयारी सुरू केली निवडणूक जाहीर होण्याच्या आधी उमेदवारांची घोषणा देखील केली होती. त्यामुळे निवडणूक रणनीतीत काँग्रेस भाजपच्या आधीच तयारीला लागली होती. त्याचाही चांगला परिणाम निकालावर दिसून आला. भारत जोडो यात्रेत 51 विधानसभा मतदारसंघ राहुल गांधी यांनी जोडले होते. त्यातील 38 मतदार संघ काँग्रेसने जिंकले आहेत राहुल गांधींचा हा स्ट्राईक रेट तब्बल 78% आहे.
दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला अनेक ठिकाणी परभवाला सामोरं जावं लागलं. भाजप सरकारमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्यानं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीपासून कॉंग्रेस आघाडीवर असल्याचं दिसत होतं. दरम्यान, आता कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण असून कॉंग्रेस सत्तारुढ होणार असल्याचे दावे कॉंग्रेसचे अनेक नेते करत आहेत.