Karnataka Election Result : काँग्रेसची ‘हनुमान उडी’ :ट्रेंडमध्ये बहुमताचा आकडा गाठला !

Karnataka Election Result : काँग्रेसची ‘हनुमान उडी’ :ट्रेंडमध्ये बहुमताचा आकडा गाठला !

Congress in majority in Election Commissions trends : कर्नाटक निवडणुकीत मतमोजणीला (Karnataka Election Result 2023) आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसला (Congress) मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. भाजप सरकारमधील अनेक मंत्री पिछाडीवर पडले आहेत. भाजपचे अनेक मोठे नेते मागे पडले असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कॉंग्रेसने सर्व आमदारांना बेंगळुरूला बोलावलं; हैद्राबादमध्ये रिसॉर्ट देखील बुक केले

दरम्यान निवडणुक आयोगाने 224 पैकी 223 जागांचे कल जारी केले आहेत. निवडणूक आयोगाच्या ट्रेंडमध्येही काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. भाजपसह जेडीएसलाही झटका बसला आहे. निवडणुक आयोगाने 224 पैकी 223 जागांचे कल जारी केले आहेत. काँग्रेस- 115 जागा, 43.1 टक्के मतं मिळाले आहेत. भाजप- 73 जागा, 36.2 टक्के मतं आहेत. तर जेडीएस- 30 जागा, 12. 8 टक्के मतं मिळाले आहेत. तर इतर- 5 जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान र्नाटकात काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू शकते. अशा स्थितीत पक्षाने आपले आमदार फुटण्यापासून वाचवण्याची तयारी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube