अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण; वाचा नेमका उल्लेख काय?

Baramati Plane Crash तर्क वितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन विमान अपघात तपास ब्युरोकडून करण्यात आले आहे.

  • Written By: Published:
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण; वाचा नेमका उल्लेख काय?

AAIB Provides Update On investigation Of Learjet 45 (VT-SSK) Accident At Baramati : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक महत्वाची माहिती समोर आली असून, पहिल्यांदाच विमान अपघात तपास ब्युरोकडून अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डर जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे त्यावर गंभीर परिणाम झाल्याचं विमान अपघात तपास ब्युरोकडून सांगण्यात आलं आहे. दादांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांनी सर्व घटनेची AAIB कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानतर पहिल्यांदाच या अपघाताबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

अजित पवारांचा अपघात, दिल्लीतून त्या फाईलवर नकारात्कमक शेरा, राऊतांचा खळबळजनक दावा

AAIB चे कामकाज कसे चालते?

एएआयबी ही स्वतंत्र चौकशी संस्था असून ती केंद्रीय हवाई उड्डान मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. या चौकशी यंत्रणेला जगातील कोणत्याही चौकशी यंत्रणेची मदत मागून या अपघाताची चौकशी करता येते अशी तरतूद आहे. एएआयबी ही स्वतंत्र चौकशी संस्था असून ती केंद्रीय हवाई उड्डान मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. या चौकशी यंत्रणेला जगातील कोणत्याही चौकशी यंत्रणेची मदत मागून या अपघाताची चौकशी करता येते अशी तरतूद आहे.

लेजरजेट 45 एअरक्राफ्टबाबत AAIB ने काय सांगितलं?

अजित पवारांच्या विमानात दोन रेकॉर्डर होते. हे बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरला नुकसान झालं आहे. त्यापैकी L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात ब्युरोला यश मिळालं आहे. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरवर सखोल तांत्रिक तपास सुरू आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हनीवेल कंपनीनिर्मित असून संबंधित देशातील अधिस्वीकृत प्रतिनिधींची मदत मागितलेली आहे. तर्क वितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन विमान अपघात तपास ब्युरोकडून करण्यात आले आहे. ब्युरो इंटरनॅशनल स्टॅंडर्डनुसार पुरावेनिष्ठ तपास करत अशल्याचं सांगण्यात आलं आहे. AAIB Provides Update On investigation Of Learjet 45 (VT-SSK) Accident At Baramati

अजितदादांचा अपघात झाला त्या विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न

विमान कोसळणार असेल म्हणूनच…

विमान अपघाताच्या काही क्षण आधी सहवैमानिक असलेल्या कॅप्टन शांभवी पाठक यांच्या संवादाची एक क्लिप समोर आली होती. यामध्ये त्या, ‘ओह शीट… ओह शीट बोलताना ऐकू येत आहे. त्यांना आता आपले विमान कोसळणार याचा अंदाज आल्यामुळंच त्या तसं बोलल्या असाव्यात, असा तर्क रोहित पवार यांनी मांडला आहे. विमान खूप खाली आल्यानंतर स्टॉल वॉर्निंग सिस्टीम सुरु होतं. पण स्टॉल वॉर्निंग सिस्टीम बंद असावी. मात्र, विमान खूप खाली आल्यानंतर आता ते कोसळणार, याचा अंदाज कॅप्टन शांभवी पाठक यांना आला असेल. जो माणूस जीवाची पर्वा करतो, तशीच प्रतिक्रिया कॅप्टन शांभवी पाठक यांच्याकडून आली. त्यामुळं त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये ‘ओह शीट… ओह शीट’ बोलताना ऐकू येत आहे. यानंतर 9 ते 10 सेकंदात विमान खाली कोसळलं. आमचा कॅप्टन शांभवी पाठक यांच्यावर कोणताही आक्षेप नाही. आमचा आक्षेप मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्यावर आहे, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

follow us