पाकिस्तानची पुढची पायरी सुपर 8; भारताशी पुन्हा भिडणार का?

पाकिस्तानने आपल्या गटातील सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली, तर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • Written By: Published:
Untitled Design 1

Will we see the India-Pakistan match again? : टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाने दमदार कामगिरी करत सुपर 8 फेरीत प्रवेश केला आहे. ग्रुप स्टेजमधील शेवटच्या सामन्यात नामिबियाच्या टीमला तब्बल 102 धावांनी पराभूत करत पाकिस्तानने पुढील फेरी गाठली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 200 धावांचे आव्हान उभे केले होते. प्रत्युत्तरात नामिबियाचा डाव 17.3 षटकांत सर्वबाद झाला आणि त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला.

पाकिस्तानचे सुपर 8 सामने

सुपर 8 फेरीला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तानचा पहिला सामना 21 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड विरुद्ध होईल. त्यानंतर 24 फेब्रुवारीला इंग्लंडशी लढत होणार आहे. तर 28 फेब्रुवारीला श्रीलंकेविरोधात तिसरा आणि महत्त्वाचा सामना खेळवला जाईल. सुपर 8 फेरीत ग्रुप ए मध्ये भारत, साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाम्बवे यांनी स्थान मिळवले आहे. तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानसमोर तीनही बलाढ्य संघांचे आव्हान असल्याने सेमीफायनल गाठणे त्यांच्यासाठी सोपे नसणार आहे.

देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराडच्या अडचणीत वाढ, दुसऱ्या प्रकरणातही आलं नाव

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार?

15 फेब्रुवारीला झालेल्या ग्रुप स्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी मात केली होती. त्या सामन्यात पाकिस्तानचा डाव 114 धावांवर आटोपला होता. सुपर 8 फेरीत भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात असल्याने थेट सामना होणार नाही. मात्र पाकिस्तानने आपल्या गटातील सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली, तर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 4 मार्च रोजी एक सेमीफायनल सामना कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

follow us