खाजगी कंपन्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचे कडक निर्देश! कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, अन्यथा…

Maharashtra Rain work from home राज्यात र पावसाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी खाजगी कंपन्यांना कडक निर्देश दिले.

Devendra Fadanvis (7)

Maharashtra Rain Chief Minister Fadnavis’s strict directive to private companies Allow employees to ‘work from home’ : राज्यात सर्वदूर पावसाने थैमान घातले असून, ठिकठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. घाटमाथ्यावर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेत खाजगी कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत.

खासगी कंपन्यांनी WFH न दिल्यास…

राज्यात पुढील दोन दिवस, म्हणजे 8 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच परिस्थितीनुसार खासगी कंपन्या आणि कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्या किंवा आस्थापनांविरोधात आवश्यक त्या कायदेशीर कारवाया करण्यात येतील. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

‘मोआना’ स्टार कॅथरीन लगाआयाचा प्रेरणादायी प्रवास; “मला अनेक संधी स्वीकारण्याची भीती वाटत होती”

दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांना 24 तास सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत राज्यातील विविध भागांत भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, त्यातून मोठे नुकसान झाले आहे.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे माती आणि मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, मार्ग पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभाग युद्धपातळीवर काम करत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

स्टार प्लसच्या ये फितूर तेरा चा नवा प्रोमो; मुलींच्या को-एज्युकेशनल भावनिक प्रवासाची कहाणी!

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह राज्यातील किनारपट्टी भागात ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रात भरतीची तीव्रता वाढण्याचा अंदाज असल्याने संभाव्य धोकादायक भागांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांच्या पथकांची तैनाती करण्यात आली आहे.

follow us