हवामान विभागाने आज शनिवार आणि रविवारसाठी मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, दक्षिण कोकणलाही यलो अलर्ट.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पु्णे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल (Pune Rains) असा अंदाज आहे.
सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात
आज आणि उद्या नाशिक, नगर, पु्णे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
आजपासून पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
आज मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सध्या परतीच्या पावसाचे वारे वाहत आहेत. दरम्यान शेजारील नेपाळमध्ये वादळी पाऊस झाला आहे. त्याचा काहीचा फटका बिहारला बसण्याची शक्यात आहे.
Maharashtra Rain Update : राज्यात काल मान्सूनच्या परतीच्या (Maharashtra Rain) पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मुंबईत तर काल रात्री धो धो पाऊस (Heavy Rain) कोसळला. पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणतील जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी होती. आजही पावसाचा मुक्काम कायम राहणार असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता […]
पुढील दोन दिवस मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत मुंबई, पुण्याला ऑरेंज तर, नाशिक, पालघरला रेड अलर्ट देण्यात आलायं.
विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.