अहमदाबाद विमान अपघात : पायलटने जाणूनबुजून…इटालियन वृत्तपत्राचा दाव्याने खळबळ…

अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच एअर इंडिया फ्लाइट 171 क्रॅश झाले. या अपघातात 260 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

  • Written By: Published:
अहमदाबाद विमान अपघात : पायलटने जाणूनबुजून...इटालियन वृत्तपत्राचा दाव्याने खळबळ...

Air India Plane Crash Due To Pilot Cut Fuel Switch : अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत पायलटने जाणूनबुजून इंजिन इंधन नियंत्रण स्विच बंद केला असा धक्कादायक दावा इटालियन वृत्तपत्र ‘कोरीएर डेला सेरा’ने नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील दोन सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. वृत्तपत्राच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाचा भीषण विमान अपघात ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे झाली नव्हती तर “जाणूनबुजून केलेल्या कृत्याचा परिणाम” होती, असा निष्कर्ष अपघाताची चौकशी करणाऱ्या तपासकर्त्यांनी काढल्याचं वृत्त इटालियन दैनिक ‘कोरीएर डेला सेरा’ने दिले आहे.

अहमदाबाद विमान अपघात अन् 4 दिवसांनी आजारी पडले 112 पायलट, संसदेत धक्कादायक खुलासा

260 प्रवाशांचा गेला नाहक बळी

अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच एअर इंडिया फ्लाइट 171 क्रॅश झाले. या अपघातात 260 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर, या अपघातातून एकमेव प्रवासी विश्वकुमार रमेश बचावले होते. या घटनेनंतरच्या सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की, हा अपघात इंजिनमध्ये इंधन कमी झाल्यामुळे झाला. त्यानंतर इंधन कमी करणे तांत्रिक कारणांमुळे झाले की जाणूनबुजून असे प्रश्न उपस्थित झाले. या विमानाचे प्रमुख पायलट कॅप्टन सुमित सभरवाल होते आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर सह-पायलट होते.

दादरी ते अहमदाबाद; देशातील दहा मोठे विमान अपघात

12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 878 ड्रीमलाइनर विमानाच्या अपघाताची चौकशी अजूनही सुरू असताना, इटालियन वृत्तपत्र दैनिक कोरीएर डेला सेरा यांनी बोईंगला दोषमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. इटालियन वृत्तपत्राचा दावा आहे की, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला नव्हता, तर इंजिनचे इंधन नियंत्रण स्विच जाणूनबुजून बंद केल्याने झाला आहे. Air India Plane Crash Due To Pilot Cut Fuel Switch

एका वैमानिकाने इंजिनचे इंधन नियंत्रण स्विच बंद केले

इटालियन दैनिकाच्या वृत्तानुसार, तपासकर्त्यांनी असा दावा केला आहे की, एका वैमानिकाने इंजिनचे इंधन नियंत्रण स्विच बंद केले, ज्यामुळे विमानाची पॉवर गेली आणि ते जमिनीवर कोसळले. यात मुख्य संशय हा कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर आहे. मात्र, विमान अपघातनंतर तपास ब्युरोचा प्रारंभिक अहवाल पायलट्स असोसिएशन आणि सुमित सभरवालच्या वडिलांनी नाकारला आहे. जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक अहवालात कॉकपिटमधील शेवटच्या संवादाचा उल्लेख करण्यात आला होता. ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंगनुसार, एक पायलट विचारत होता, “तू इंधन पुरवठा का बंद केलास?” त्यावर दुसऱ्याने उत्तर दिलं होतं की, “मी असं काही केलं नाही.” या संवादावरून तपास यंत्रणांचा संशय अधिक बळावला आहे.

follow us