10 किलो गहू – तांदूळ अन् 5 हजारांची मदत; पूरग्रस्त नागरिकांसाठी आमदार सुरेश धसांची मोठी घोषण
Suresh Dhas : संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात

Suresh Dhas : संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शिरुर, कासार आणि पाटोदा शहरासह ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
या पूरग्रस्त भागामध्ये आज भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पाहणी करत नागरिकांना आणि शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच प्रशासनाच्या वतीने स्थानिक नागरिकांना तात्काळ 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 5 हजाराची मदत देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या दौऱ्यात आमदार सुरेश धस यांनी पाटोदा शहरासह शेतीच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
यानंतर माध्यमांशी बोलताना ज्या शेतकऱ्यांची पिकं वाहून गेले आहेत, जमीन वाहून गेल्या आहेत, मोटर वाहून गेले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना देखील तात्काळ मदत देण्यात येणार आहे अशी माहिती दिली. तसेच आष्टी मतदारसंघातील पाटोदा शहरात जवळपास 250 घरांमध्ये पाणी शिरले, तर शिरूर कासार शहरातील जवळपास 46 घरांमध्ये पाणी शिरल्याचीही माहिती यावेळी आमदार सुरेश धस यांनी दिली.
तर दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे सिंदफणा नदीला महापूर आल्याने नांदुर हवेली गावातील अनेक घरात पाणी शिरले होते. मोठ्या प्रमाणात घरात पाणी घुसल्याने अनेक नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. या गावात मंत्री गिरिश महाजन यांनी भेट देत मदत करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे.
Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये पाकिस्तानला अखेरची संधी, आजच्या सामन्यावर ठरणार भवितव्य
राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी सर्तक राहावे असे आवाहन देखील देण्यात आले आहे.