Zilla Parishad Result : ठाकरे घराण्याची सून पुन्हा पुणे जिल्हा परिषदेत; अंकिता ठाकरे 15755 मतांनी विजयी

Zilla Parishad Election Results : राज्यातील 12 जिल्हापरिषद आणि 125 पंचायत समितींचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण

  • Written By: Published:
Zilla Parishad Election Results

Zilla Parishad Election Results : राज्यातील 12 जिल्हापरिषद आणि 125 पंचायत समितींचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीचे प्रत्येक अपडेट लेट्सअप मराठीवर जाणून घ्या …

LIVE NEWS & UPDATES

  • 09 Feb 2026 07:55 PM (IST)

    हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि ठाकरे घराण्याची सून अंकिता पाटील ठाकरे विजयी

    इंदापूर जिल्हा परिषदेतील बावडा लुमेवाडी येथून हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि निहार बिंदू ठाकरे यांची पत्नी अंकिता ठाकरे 15755 मतांनी विजयी पक्ष (राष्ट्रवादी)

  • 09 Feb 2026 07:50 PM (IST)

    राष्ट्रवादीला सत्ता देऊन मायबाप जनतेने अजितदादांना एकप्रकारे आदरांजली अर्पण केली

    राज्यातील पुणे आणि सांगली जिल्हा परिषदेसह ३३ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीला सत्ता देऊन मायबाप जनतेने अजितदादांना एकप्रकारे आदरांजली अर्पण केली. तसंच राज्यात निवडून आलेल्यांमध्ये पक्षाचा दुसरा-तिसरा क्रमांक लागतो. अजितदादा आज आपल्यात असते तर अधिक मोठं यश बघायला मिळालं असतं, पण दुर्दैवाने नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेलं. आता निवडून आलेले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व सदस्य अजितदादांच्या विचारांप्रमाणे सामान्य माणसाच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करतील, असा विश्वास आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्सवर केली आहे.

  • 09 Feb 2026 07:38 PM (IST)

    माय बाप जनतेचे आभार - जयंत पाटील

    जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीवर मोठ्या प्रमाणात विश्वास टाकला त्याबद्दल मी तिन्ही पक्षांच्या वतीने माय बाप जनतेचे आभार व्यक्त करतो. जिल्ह्यात हुकूमशाही सुरू होती, गुंडगिरीला खतपाणी घातले जात होते, वादग्रस्त वक्तव्य करून जिल्ह्याच्या संस्कृतीला डाग लावण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच शेतकऱ्यांवर अन्यायकारक नियम लादले जात होते. या सर्वांना जनतेने मतदानातून उत्तर दिले आहे. सांगलीच्या मातीने कधीही अविचारांना थरा दिला नाही. आपल्या जिल्ह्याची ही ओळख अबाधित ठेवण्यासाठी जनतेचे पुनश्च एकदा आभार!

  • 09 Feb 2026 07:08 PM (IST)

    दादा... आज हे यश पाहण्यासाठी तुम्ही असायला हवे होतात !

    एक खंबीर नेतृत्व गमावल्यानंतर सैन्याची ताकद टिकवून ठेवणं हे आमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं. पण जनतेच्या प्रेमामुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मिळालेला हा विजय आमचं मनोबल वाढवणारा आहे.

  • 09 Feb 2026 06:57 PM (IST)

    पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतून काँग्रेस हद्दपार

    पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेत एकाही जागेवर काँग्रेस विजय नाही

    जिल्हा परिषद १५ जागेवर काँग्रेस निवडणूक लढवत होती मात्र एकाही ठिकाणी विजय नाही.

    २०१७ ला काँग्रेसला ७ जिल्हा परिषदेच्या जागा जिंकता आल्या होत्या

    ७३ जागा असलेल्या पुणे जिल्हा परिषदेत एकही जागा काँग्रेसला जिंकता आली नाही

    एकेकाळी काँग्रेसचे बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नाही.

    इंदापूर,भोर,पुरंदर या तालुक्यात काँग्रेस बालेकिल्ला होता. मात्र स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला यावेळेस भोपळाही फोडता आला नाही

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळवली आहे

  • 09 Feb 2026 06:42 PM (IST)

    12 जिल्हा परिषदांमध्ये कोणाची सत्ता?

    १) सोलापूर जिल्हा परिषद निकाल एकूण जागा ६८

    भाजपा - ४२
    शिंदेसेना - ७
    राष्टवादी काँग्रेस (अजित पवार) - ९
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 0
    काँग्रेस - १
    उद्धवसेना - ०
    इतर - १

    २) पुणे जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा ७३

    भाजपा - १०
    शिंदेसेना - ४
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ४८
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १
    उद्धवसेना - ६
    काँग्रेस - ०

    ३) कोल्हापूर जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा - 68

    भाजपा - १२
    शिंदेसेना - ८
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- २०
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
    काँग्रेस - १५
    उद्धवसेना - १
    जनसुराज्य - ५
    स्वाभिमानी शेतकरी संघटना - १
    शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – ४

    ४) छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकाल एकूण जागा ६३

    भाजपा - २३
    शिंदेसेना - २०
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ४
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १
    काँग्रेस - १
    उद्धवसेना ९
    इतर -५

    ५) परभणी जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा ५४

    भाजपा - २३
    शिंदेसेना - ५
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १४
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
    काँग्रेस - ३
    उद्धवसेना - ६
    इतर - ३

    ६) धाराशिव जिल्हा परिषद निकाल - एकूण जागा ५५

    भाजपा -१६
    शिंदेसेना - १५
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
    काँग्रेस - ३
    उद्धवसेना - ७
    इतर - ५

    ७) लातूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५९

    भाजपा - १८
    शिंदेसेना - १
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १२
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १
    काँग्रेस - २३
    उद्धवसेना - १
    इतर - ३

    ८) रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५९

    भाजपा - ६
    शिंदेसेना - २६
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- १६
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) -०
    काँग्रेस - ०
    उद्धवसेना - ३

    ९) रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक - एकूण जागा ५६

    भाजपा - ४
    शिंदेसेना -४०
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
    काँग्रेस - ०
    उद्धवसेना - ६
    इतर - १

    १०) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५०

    भाजपा - २७
    शिंदेसेना - १४
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ०
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०
    काँग्रेस - ०
    उद्धवसेना - ३
    इतर ६

    ११) सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ६५

    भाजपा - २३
    शिंदेसेना - १३
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - २२
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १
    काँग्रेस - ०
    उद्धवसेना - ०
    इतर - ०

    १२) सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ६१

    भाजपा - १७
    शिंदेसेना - ६
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १७
    काँग्रेस - ११
    उद्धवसेना - १
    इतर - २

  • 09 Feb 2026 06:38 PM (IST)

    आमच्या कामावर जनतेचं शिक्कामोर्तब; ZP निकालांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

    अजित पवारांच्या निधनाचं आम्हाला दु:ख आहे. राज्यातील 7 जिल्हा परिषदांमध्ये भाजप नंबर 1. महायुतीला 125 पैकी 100 च्या वर पंचायत समिती जिंकता आल्या. आमच्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केलयं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

  • 09 Feb 2026 03:55 PM (IST)

    अजित पवार यांनी शेवटच्या सभेत प्रचार केलेल्या उमेदवाराचा विजय

    पुण्याच्या खेड तालुक्यातील वराळे येथे झालेल्या शेवटच्या सभेत अजित पवार यांनी प्रचार केलेल्या जिल्हा परिषद उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शरद बुट्टे पाटील यांचा 399 मतांनी विजय झाला आहे.

  • 09 Feb 2026 03:47 PM (IST)

    रायगडमध्ये इतिहास घडला, प्रथमच सासू–सुना जिल्हा परिषदेत

    रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत प्रथमच सासू–सुना एकाच वेळी निवडून येत इतिहास घडला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ गटातून चौथ्यांदा विजयी झाल्या असून, सुनबाई अदिती तटकरे (नाईक) यांनी चेंढरे गटातून दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे थळ–चेंढरे गटात दळवी–नाईक कुटुंबाची राजकीय पकड मजबूत झाली असून, रायगड जिल्हा परिषदेत महिला नेतृत्वाचा प्रभाव वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

  • 09 Feb 2026 03:45 PM (IST)

    भाजप आमदाराच्या कन्या सानिका आवाडे विजयी

    भाजपचे आमदार राहुल आवडे यांची कन्या सानिका आवाडे विजयी

    सनिकाच्या रुपाने आवाडे कुटुंबियांची चौथी पिढी राजकारणात सक्रिय

    सानिका जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची असू शकते दावेदार

  • 09 Feb 2026 02:16 PM (IST)

    जयकुमार गोरे यांच्या भावजय भारती गोरे 40 मतांनी पराभूत

    औंध जिल्हा परिषद गटात मंत्री जयकुमार गोरे यांच्या भावजय भारती गोरे 40 मतांनी पराभूत! राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा फडतरे यांनी केलं पराभूत!

  • 09 Feb 2026 01:57 PM (IST)

    पुण्याच्या खेड पंचायत समितीवर उबाठा शिवसेनेची सत्ता 16 पैकी 12 जागांवर विजय

    - पुण्याच्या खेड पंचायत समितीवर उबाठा शिवसेनेची सत्ता 16 पैकी 12 जागांवर विजय

    -जिल्हा परिषदेलाही पाच जागांवर विजय

    -आमदार बाबाजी काळेंना यश मात्र बहिणीचा पराभव

    =गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती आमदार काळेंची झालीय

  • 09 Feb 2026 01:41 PM (IST)

    शिरूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का

    खेड शरद बुट्टे पाटील (अजित पवार गट) विजयी. आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री काळे यांचा पराभव. शिरूर ग्रामीण न्हावरा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का. स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांचा राष्ट्रवादीच्या वृषाली वाळके यांनी केला पराभव. 126 मतांनी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वृषाली वाळके यांचा विजयी.

  • 09 Feb 2026 01:24 PM (IST)

    जिल्हा परिषद निवडणूक निकाल (दुपारी 1 वाजताच्या कलानुसार)

    भाजप - 175
    शिवसेना - 104
    शिवसेना ठाकरे - 24
    राष्ट्रवादी काँग्रेस - 93
    राष्ट्रवादी शरद पवार - 15
    काँग्रेस - 19
    इतर - 25

  • 09 Feb 2026 01:18 PM (IST)

    पुणे जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी वाचा

    जुन्नर

    ओतूर : छाया तांबे (राष्ट्रवादी)

    बोरी बु. : कल्पना काळे (राष्ट्रवादी)

    आळे : मंगेश काकडे (शिवसेना)

    राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना - शिंदे गट)

    सावरगाव : गुलाबराव पारखे (शिवसेना)

    आंबेगाव

    पारगाव तर्फे अवसरे : विवेक वळसे (राष्ट्रवादी)

    कळंब: प्रीती थोरात (राष्ट्रवादी शरद पवार)

    शिनोली: शीला लोहकरे (राष्ट्रवादी)

    अवसरी बु: विष्णु हिंगे (राष्ट्रवादी)

    शिरूर

    कवठे यामाई ; राजेंद्र गावडे ( भाजप)

    न्हावरा: वृषाली वाळके (राष्ट्रवादी)

    रांजणगाव गणपती: स्वाती पाचुंदकर (भाजप)

    खेड

    कुरळी : विनया मुंगसे (राष्ट्रवादी)

    मावळ

    टाकवे बु: अनंता पावसे (राष्ट्रवादी)

    इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी)

    खरकाळे : दीपाली हुलावले (राष्ट्रवादी)

    कुसगाव बु: संतोष राऊत (राष्ट्रवादी)

    सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी)

    मुळशी

    पिरंगुट : आबा शेळके (शिवसेना उबाठा)

    हवेली

    कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी)

    पेरणे: किरण साकोरे (भाजप)

    दौंड

    खडकी : वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी)

    पुरंदर

    गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी)

    बेलसर: ज्ञानोबा यादव (भाजप)

    वेल्हे

    विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी)

    वेल्हे बु : तानाजी मांगडे (राष्ट्रवादी)

    भोर

    भोंगवली: चंद्रकांत बाठे (अपक्ष)

    बारामती

    सूपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी)

    इंदापूर

    भिगवण: मेघना बंडगर (राष्ट्रवादी)

  • 09 Feb 2026 01:01 PM (IST)

    सोलापूर जिल्हा पंचायत समिती निकाल

    करमाळा – भाजप – 2 – राष्ट्रवादी – 2 – स्थानिक – 4

    माढा – भाजप – 4 – राष्ट्रवादी – 5

    बार्शी – भाजप – 10

    सोलापूर उ. – भाजप – 5 राष्ट्रवादी – 1

    मोहोळ – राष्ट्रवादी – 4 भाजप – 7

    पंढरपूर – भाजप – 8 राष्ट्रवादी SP – 4

    माळशिरस – भाजप – 6 राष्ट्रवादी 3

    सांगोला – – शिवसेना – 2 – भाजप 1 – स्थानिक आघाडी – 4

    मंगळवेढा – भाजप – 4 स्थानिक आघाडी – 3

    सोलापूर द. – भाजप – 6 काँग्रेस – 1

    अक्कलकोट – भाजप – 8 शिवसेना – 2

  • 09 Feb 2026 12:59 PM (IST)

    बारामती पंचायत समिती

    शिरसुफळ पंचायत समिती गणातून भाजपचे अनिकेत बाळासाहेब गावडे विजयी.
    सुपे पंचायत समिती घनातून उज्वला पोपट खैरे या विजयी

    स्वर्गीय अजित पवार यांनी भाजपसाठी सुपे पंचायत समिती गण आणि दोन जागा सोडल्या होत्या त्या दोन्ही जागेवर भाजपचे उमेदवार विजयी

    रांजणगाव गणपती - करेगाव गट
    स्वती पचुंदकर (भाजप) विजयी,
    रांजणगाव गणपती गण
    सागर दरेकर (भाजप) विजयी
    करेगाव गण
    मनीषा पाचंगे (भाजप)विजयी
    शिरूर ग्रामीण - न्हावरे गट
    वृषाली वाळके (राष्ट्रवादी) 126 मतांनी विजयी
    शिरूर ग्रामीण गण
    स्वती घावटे (राष्ट्रवादी ) विजयी
    न्हावरे गण
    दीपक कोहकडे (राष्ट्रवादी ) विजयी

  • 09 Feb 2026 12:55 PM (IST)

    जत तालुक्यात उमदी गणात संगीता सांवत विजयी; आमदार गोपीचंद पडळकरांना धक्का

    सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उमदी गणात काँग्रेसच्या उमेदवार संगीता बाबूराव सांवत यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली. या निकालामुळे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

  • 09 Feb 2026 12:55 PM (IST)

    जुन्नरमध्ये कोण जिंकलं, कुणाला किती जागा? वाचा यादी

    गट. विजयी उमेदवार. पक्ष

    डिंगोरे.  सोनाबाई दाभाडे. राष्ट्रवादी

    ओतूर. छाया तांबे. राष्ट्रवादी

    आळे. मंगेश अण्णा काकडे. शिवसेना

    राजुरी. स्मिता कणसे. शिवसेना

    बोरी. कल्पना काळे. राष्ट्रवादी

    नारायणगाव नेहा पाटे. शिवसेना

    सावरगाव. गुलाब पारखे. शिवसेना (ठाकरे )

    बारव. मोनाली लांडे. राष्ट्रवादी

    राष्ट्रवादी- ठाकरे आघाडी ५ जागा

    शिवसेना-०३

  • 09 Feb 2026 12:48 PM (IST)

    भोरमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पती-पत्नी विजयी

    पती झेडपीच्या गटातून विजयी.. तर पत्नी पंचायत समितीच्या गणातून विजयी. भोरमधील भोंगवली-कामथडी गटातून राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड विजयी.. तर त्यांच्या पत्नी तृप्ती खुटवड भोर पंचायत समितीच्या कामथडी गणातून विजयी..

  • 09 Feb 2026 12:46 PM (IST)

    जिल्हा परिषदेच्या ४६१ पैकी भाजपाने १७० जागांवर घेतली आघाडी

    राज्यात १२ जिल्हा परिषदांसाठी निवडणुका पार पडल्या. यामध्ये ४६१ जागांसाठी निवडणूक झाली. १२.४० मिनिटांपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपाने १७० जागा, तर  शिवसेना-९८, राष्ट्रवादी-९२, काँग्रेस -३७, ठाकरे सेना-२४, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार-१६ आणि इतर २४ जागांवर आघाडीवर आहेत.

  • 09 Feb 2026 12:44 PM (IST)

    गोकुळच्या माजी अध्यक्षांची कन्या विजयी

    कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य पुरस्कृत अमरसिंह पाटील विजयी
    भुदरगड तालुक्यातील आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेच्या अर्चना कल्याण निकम विजयी
    आकुर्डे पं. स - भाजपचे एकनाथ जाधव विजयी
    कुर पं. स. शिवसेनेचे विक्रम पाटील विजयी
    गोकुळच्या माजी अध्यक्षांची कन्या, राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता डोंगळे याचा विजय. कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी.

  • 09 Feb 2026 12:40 PM (IST)

    आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत 2187 मतांनी विजयी

    धाराशिवमध्ये माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत 2187 मतांनी विजयी, परंडा तालुक्यातील जवळा गटातून बंडखोरी करत भाजप पुरस्कृत अपक्ष लढवली होती निवडणूक

  • 09 Feb 2026 12:37 PM (IST)

    उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांचा पराभव

    सोलापूरच्या मोहोळच्या नरखेड गटातून राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांचा पराभव

  • 09 Feb 2026 12:37 PM (IST)

    घराणेशाहीला परभणीकरांनी नाकारलं, माजी मंत्री वरपूडकर यांच्या घरातील चौघांचा पराभव

    परभणीमध्ये घराणेशाहीला परभणीकरांनी नाकारल्याचे चित्र समोर आले आहे. माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या घरातील एक दोन नव्हे तर तब्बल चौघांना जनतेने नाकारले सुरेश वरपूडकर यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर शिंगणापूर जिल्हा परिषद सर्कलमधून ठाकरे गटाचे पांडुरंग खिल्लारे यांनी पराभव केलाय. सून प्रेरणा वरपूडकर यांचा दैठणा येथून काँग्रेसचे ज्योत्स्ना घाडगे यांनी पराभव केला आहे तर, वरपूडकर यांच्या कन्या सोनल यांचा भाजपचे दिलीप देशमुख यांनी झरीमधून पराभव केला आहे.

  • 09 Feb 2026 12:35 PM (IST)

    पुणे झेडपीमध्ये कोणाची हवा? 73 जागा

    भाजप- 17
    शिंदेसेना - 12
    राष्ट्रवादी अ. प. - 36
    राष्ट्रवादी श. प. - 05
    ठाकरे सेना - 02
    काँग्रेस - 01

  • 09 Feb 2026 12:35 PM (IST)

    रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक विजयी

    रत्नागिरीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील 400 मतांच्या फरकाने विजयी झालेले आहे.

  • 09 Feb 2026 12:34 PM (IST)

    आंबेगाव गटातून दिलीप वळसे पाटलांचा पुतण्या विजयी

    आंबेगाव गटातून दिलीप वळसे पाटलांचा पुतण्या विजयी
    विवेक वळसे पाटलांचा विजय
    विवेक वळसे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार

  • 09 Feb 2026 12:26 PM (IST)

    पुण्याच्या वेल्हाच्या विंझर गणातून भाजपाचे गणेश जावडे विजयी

    पुण्याच्या वेल्हाच्या विंझर गणातून भाजपाचे गणेश जावडे विजयी

  • 09 Feb 2026 12:26 PM (IST)

    सांगली जिल्या परिषदेत भाजपची सरशी

    सांगली जिल्हा परिषद 61 गट निवडणूक निकाल - आघाडी

    भाजपा - 16 जागांववर

    राष्ट्रवादी अजित पवार - 05 जागांवर आघाडीवर

    शिवसेना शिंदे - 04 जागांवर आघाडीवर

    काँग्रेस - 09 जागांवर आघाडीवर

    राष्ट्रवादी शरद पवार - 10 जागांवर

    शिवसेना ठाकरे गट - 01

follow us