ऐकावं ते नवलचं! मुंबईच्या पोरीनं तब्बल 60 दिवस गाढ झोप घेत कमावले 9 लाख 60 हजार
Sleep Internship : एका नामांकित कंपनीने घेतलेल्या विचित्र स्पर्धेत मुंबईतील तरुणीने नुसतं झोपून चक्क 9 लाख आणि एक स्पॉन्सरड व्हॅकेशन जिंकलंय.
Mumbai Woman Wins 9.6 Lakh In Sleep Internship : जर मी तुम्हाला म्हटलं की, आजपासून तुम्हाला फक्त छानपैकी झोपायचं आहे… आणि बदल्यात तुम्हाला मिळेल तब्बल 10 लाख रुपयांची नोकरी, तर तुमचा विश्वास बसेल का? तुम्ही म्हणाल, ‘असं कधी कुठे होतं का? झोपून कुठे पैसे मिळतात?’ पण हे खरोखर घडलंय. एका नामांकित कंपनीने घेतलेल्या या विचित्र स्पर्धेत मुंबईत राहणाऱ्या एका तरुणीने नुसतं झोपून आणि झोपण्याच्या सवयी सुधारून चक्क 9 लाख 63 हजार 400 रुपये आणि एक स्पॉन्सरड व्हॅकेशन जिंकलंय. ही स्पर्धा नेमकी कोणती होती? यात नेमके कोणते टास्क होते? ते बघूया…
या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते ते, ‘वेकफिट’ नावाच्या प्रसिद्ध मॅट्रेस आणि स्लीप-प्रॉडक्ट्स कंपनीने. या स्पर्धेला असा तुफान प्रतिसाद मिळेल असे कंपनीला वाटले नव्हते पण, यासाठी देशभरातून थोडे-थोडके नव्हे तर, तब्बल दोन लाखांहून अधिक लोकांनी अर्ज केले होते. पण कंपनीला हवे होते फक्त 10 हुशार आणि ‘गाढ’ झोपेचे चाहते. शेवटी अटीतटीच्या निवडीतून देशभरातून केवळ 10 जणांची फायनल निवड करण्यात आली आणि सुरू झाला झोपेचा खरा खेळ…
आता तुम्ही म्हणाल, ‘यात काय एवढं? 60 दिवस फक्त झोपायचंच तर होतं ना?’ तर जरा थांबा… कारण, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! ही स्पर्धा जितकी आरामाची होती, तितकीच ती डोकं भडकवणारी आणि आश्चर्यकारक टास्कने भरलेली होती. स्पर्धकांना 60 ‘स्लीप सिनेमा’ मध्ये लोकप्रिय चित्रपटांचे सीन्स झोपेच्या ट्विस्टसह रीक्रिएट करावे लागले. ‘स्लीप बिंगो’ मध्ये स्पर्धकांचा संपूर्ण आठवड्याच्या झोपेच्या लफड्यांचा कच्चा चिट्ठा काढला गेला आणि सर्वात खतरनाक टास्क होता तो, ‘अँडरकव्हर स्लीप मिशन’ यात समोरच्या व्यक्तीला पत्ताही लागू न देता गप्पा मारताना 10 वेळा ‘ब्लँकेट’ किंवा ‘उशी’ हा शब्द उच्चारायचा होता. कोणतीही चूक झाली की बाहेर फेरबदल. Mumbai Woman Wins 9.6 Lakh In Sleep Internship
अखेर 60 दिवसांच्या या महासंग्रामात 4 फायनलिस्ट उरले. या 4 फायनलिस्टसाठी हुबेहूब एखाद्या थ्रिलर रिॲलिटी शोला शोभेल असा ग्रँड फिनाले जो अगदी एखाद्या रिॲलिटी शोसारखा रंगला. यात होतं मेमरी फोम चॅलेंज ज्यामध्ये स्पर्धकांना संदर्भ चित्रांवरून बेडरूमची हुबेहूब रचना पुन्हा तयार करायची होती. तर दुसरं चॅलेंज होतं, स्लीप ऑक्शन म्हणजेच झोपेची निलामी. स्वतःसाठी उशा, ब्लँकेट्स, एसीचे तापमान आणि लाईटिंग खरेदी करण्यासाठी स्पर्धकांना अक्षरशः बोली लावावी लागली. त्यानंतर शेवटच्या रात्रीचा स्पर्धकांच्या झोपेचा स्कोअर मोजला गेला, ज्याने ठरवलं या अनोख्या झोपाळू स्पर्धेचा खरा बादशाह.
अखेर अटीतटीच्या रंगलेल्या या लढतीत बाजी मारली ती मुंबईच्या जिनीया चटर्जी हिने आणि 9 लाख 63 हजार 400 रुपयांसह एका शानदार सुट्टीची हकदार ठरली. गेल्या पुण्याच्या पूजा वाव्हळने या स्पर्धेची विजेती होण्याचा मान मिळवत 9.1 लाखांचे बक्षीस जिंकले होते आणि त्यानंतर यंदाचा हा मान मुंबईच्या जिनीयाने पटकावला आहे. झोप हे नुसतं वेळेचं व्यर्थ जाणे नाही, तर तो एक श्रीमंत होण्याचा गोल्डन चान्सदेखील ठरू शकतो हे जिनीयाने विजेता होतं दाखवून दिलं आहे. मग जर तुम्हालाही अशीच 60 दिवसांची ‘स्लीप इन्टर्नशिप’ मिळाली आणि बक्षीस म्हणून 10 लाख रुपये मिळणार असतील, तर तुम्ही सलग किती तास झोपून हा रेकॉर्ड ब्रेक कराल? आम्हाला नक्की सांगा.