आमदार पठारेंची पाचही बोटं तुपात! मुलगा सून महापालिकेत तर दोन्ही लेकींनी राखला झेडपीचा गड
MLA Bapusaheb Pathare यांनी महानगर पालिकेत मुलगा आणि सूनेला निवडून आणल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना झेडपीला निवडून आणलं आहे.
MLA Bapusaheb Pathares both daughter are win in ZP Election after son and daughter in laws victory in Municipals : पाचों उंगलिया घी में और सर कडाई में ही म्हण आपल्या पैकी प्रत्येकानेच ऐकलेली आहे. पण हे सर्वांच्याच बाबतीत घडत नाही. राजकारणात तर कायम प्लस मायनस चा खेळ सुरू असतो मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्याबाबतीत मात्र ही म्हण अगदी तंतोतंत लागू होत आहे. याचं कारण म्हणजे विधानसभा, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील पठारे यांच्या विजयरथाची यशस्वी घौडदौड सुरूच आहे. आता तुम्ही म्हणाल पठारेंची पाचही बोट तुपात कशी काय? जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या लेकींनी कशी बाजी मारली आणि पक्ष बदलून देखील पठारे कशाप्रकारे विजय खेचून आणतात याचंचं गमकं नेमकं काय? जाणून घेऊ सविस्तर…
राज्यात भाजपची हॅट्ट्रिक; नगरपालिका, महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेवर देखील वर्चस्व
एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी अनेक ठिकाणी घराणेशाहीला दणका दिला आगे. पण त्याला पठारे मात्र अपवाद ठरले. सुरूवातीला त्यांनी स्वत: 2024 च्या विधानसभा निवडणूकीवेळी त्यांनी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध शरद पवारांच्या पक्षाकडून कडवी झुंज देऊन ही निवडणूक जिंकली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या महानगर पालिका निवडणुकीमध्ये तर त्यांनी त्यांची ऐन निवडणुकांच्या तोंडावर पक्ष बदलून देखील निवडणुक कशी जिंकली जाते ही ओळख कायम ठेवली. यामध्ये त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे आणि त्यांच्या सूनबाई ऐश्वर्या पठारे यांना स्वत: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार असताना ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये उतरवून तिकीट मिळवून दिलं आणि निवडून देखील आणलं.
राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ तिसऱ्या क्रमांकावर, सक्षणा सलगर यांचा पराभव, खासदार ओमराजेंवर आरोप
त्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये देखील त्यांनी त्यांच्या लेकींना निवडून आणलं आहे. पठारे यांची एक मुलगी पूनम अमोल झेंडे पुरंदरमधील दिवे गराडे या गटातून राष्ट्रवादीकडून(अजित पवार) च्या उमेदवार होत्या. पूनम झेंडे या आयपीएस अमोल झेंडे यांच्या पत्नी आहेत. ते पुण्यातच पीएमआरडीए क्षेत्राचे पोलिस अधीक्षक आहेत. तर दुसरी मुलगी दिपाली राहुल गव्हाणे या शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होत्या. त्या डिंग्रजवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या आहेत. तर आई प्रबोधिनी फाउंडेशन चालवितात. त्यांची पती राहुल गव्हाणे हे व्यावसायिक आहेत.
नात्यांच्या हळव्या भावविश्वाला स्पर्श करणारे ‘माया’ चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला!
दरम्यान महानगर पालिका निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती होती. मात्र सून आणि मुलगा मुलासाठी आपल्या पक्षासाठी पठारे एकदाही प्रचाराच्या मैदानात उतरले नव्हते यावरून संपूर्ण निवडणूक प्रचारामध्ये पठारे हे अजित पवारांच्या निशाण्यावर राहिले. यावर प्रश्न विचारला असता अजित पवारांनी मिश्किल उत्तर देत पठारेंना टोला लगावला होता. मात्र जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा पठारेंच्या मुलीला उमेदवारी देखील दिली.
Nirmala Nawale : सोशल मीडियावर लाखोंची पसंती, पण निवडणुकीत नाकारलं…
दुसरीकडे वडगाव शेरी मतदार संघात बापूसाहेब पठारे यांचे प्राबल्य आहे. पठारे कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग आहे. विधानसभेत देखील ते गेल्या कित्येक काळापासून जनतेच्या मनातील ‘आमदार’ अशी असलेली त्यांची ओळख त्यांनी खरी करून दाखवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी स्वत: प्रमाणेच मुलगा सुन आणि दोन्ही लेकींना देखील निवडणुकांच्या तोंडावर वेगवेगळ्या पक्षांकडून तिकीट मिळवून दिलं आणि निवडून देखील आणलं.
