राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ तिसऱ्या क्रमांकावर, सक्षणा सलगर यांचा पराभव, खासदार ओमराजेंवर आरोप
भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील या दोन 360 मतांनी विजयी झाल्या आहेत. पाटील यांना 7 हजार 597 मते मिळाली
धाराशिव तालुक्यातील तेर गटात चुरशीची लढत झाली. (Election) याठिकाणी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या 2360 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार किर्तीमाला खटावकर यांचा पराभव केला. याठिकाणी तिरंगी झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर या तिसऱ्या स्थानावर राहिल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषदेच्या गटासाठी 110 पंचायत समितीच्या गणासाठी शनिवारी मतदान पार पडलं. त्यामुळं राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं. सोमवारी सकाळी मतमोजणी सुरु झाली असून त्यामध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. धाराशिव तालुक्यातील तेर गटात चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Zilla Parishad Result : जयकुमार गोरे यांच्या भावजय भारती गोरे 40 मतांनी पराभूत
याठिकाणी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या विजयी झाल्या. भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील या दोन 360 मतांनी विजयी झाल्या आहेत. पाटील यांना 7 हजार 597 मते मिळाली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार कीर्तिमाला खटावकर यांना 5 हजार 237 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर यांना 1 हजार 253 मते मिळाली.
विशेष म्हणजे यापूर्वी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अर्चना पाटील पराभूत झाल्या होत्या. मात्र तेर गटातील या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामध्ये अर्चना पाटील यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर या तिसऱ्या स्थानावर राहिल्या आहेत.
दरम्यान, सक्षणा सलगरर यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे आणि आमदार कौलास पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ओमराजेंनी आपली भावजई म्हणजे अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी छुपी युती केली होती असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसंच, इतर गटात युती होती पण माझ्या गटात युती केली नाही याचं कारण काय तर दोघांच्या मध्ये तिसऱ्याला स्थान नाही हे त्यांनी ठरवलं होत असंही त्या म्हणाल्या आहेत.
