Nvidia CEO Jensen Huang : भारतीय महिला ठरवणार हुआंग यांचे भवितव्य, आरती शाह कोण ?

Nvidia CEO जेन्सेन हुआंग यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; भारतीय वंशाच्या आरती शाह कंपनीच्या संचालक मंडळात महत्त्वाची भूमिका बजावणार. जाणून घ्या त्यांची कारकीर्द.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Aarti Shah

Nvidia CEO Jensen Huang : अमेरिकेतील प्रसिद्ध टेक्नॉलॉजी कंपनी Nvidia चे CEO जेन्सेन हुआंग यांच्या भवितव्याबाबत मोठे प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यांची आता कंपनी चौकशी करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाकडे आणि आगामी नेतृत्व निर्णयामध्ये भूमिका बजावणाऱ्या सदस्यांकडे लक्ष वेधले जात आहे. यामध्ये भारतीय वंशाच्या व्यावसायिक आरती शाह (Arati Shah) यांचे नाव चर्चेत आले आहे. 2020 पासून त्या Nvidia च्या संचालक मंडळाचा भाग आहेत. हुआंग CEO पदावर कायम राहणार की कंपनी नेतृत्वात बदलाचा विचार करणार, याबाबत निर्णय घेणाऱ्या संचालकांमध्ये शाह यांचा समावेश असणार आहे.

हुआंग यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांबाबतच्या वृत्तांमुळे कंपनीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झालेत. त्यामुळे Nvidia च्या व्यवस्थापनाबाबत चर्चेला वेग आला आहे. The New York Times ने दिलेल्या वृत्तानुसार, हुआंग यांचे दोन विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एका संबंधाचा उल्लेख Nvidia च्या कार्यकारी अधिकारी Kimberly Powell यांच्याशी जोडला जात आहे. Powell 2008 मध्ये Nvidia मध्ये दाखल झाल्या आहेत. कंपनीच्या हेल्थकेअर व्यवसायाचे नेतृत्व करतात. दुसऱ्या महिलेचे चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याची शक्यता अमेरिकन अधिकाऱ्यांकडून तपासली जात आहे. हुआंग यांनी पत्नीशी प्रामाणिक न राहिल्याची कबुली दिली आहे. कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांची त्यांनी माफी मागितली आहे. Reuters च्या वृत्तानुसार, कंपनीचे संचालक मंडळ हुआंग यांच्या भवितव्यावर चर्चा करण्याच्या तयारीत आहे. कायमस्वरूपी उत्तराधिकारी शोधण्यासाठी बाह्य भरती संस्थेची मदत घेण्यासोबतच अंतरिम CEO नियुक्त करण्याचाही विचार केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय वंशाच्या आरती शाह Nvidia च्या संचालक मंडळापर्यंत कशा पोहोचल्या?

आरती शाह यांची व्यावसायिक कारकीर्द सांख्यिकी आणि गणित या विषयांतील शैक्षणिक पार्श्वभूमीतून सुरू झाली. त्यांनी भारतात या विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या. अमेरिकेतील University of California, Riverside येथून त्यांनी Applied Statistics या विषयात पीएचडी मिळवली आहे. आरती शाह यांनी औषधनिर्मिती क्षेत्रातील प्रमुख कंपनी Eli Lilly मध्ये तब्बल 27 वर्षे काम केले आहे. या काळात संशोधन, सांख्यिकी, तंत्रज्ञान आणि व्यवसाय व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या कारकीर्दीत Senior Statistician, Research Scientist आणि Biometrics विभागाच्या Vice President यांसारख्या पदांचा समावेश होता. कंपनीच्या Bio-Medicines व्यवसाय विभागात त्यांनी Global Brand Development Leader म्हणूनही काम केले आहे. 2021 मध्ये Eli Lilly मधून बाहेर पडताना त्या Senior Vice President आणि Chief Information and Digital Officer या पदावर कार्यरत होत्या. यानंतर विविध मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळांवर त्यांनी स्थान मिळवले. 2023 मध्ये त्या स्वित्झर्लंडमधील औषधनिर्मिती कंपनी Sandoz Group AG च्या संचालक मंडळात दाखल झाल्या. येथे त्या Science, Innovation and Development तसेच Human Capital and ESG समित्यांमध्ये कार्यरत आहेत.

2020 पासून त्या वित्तीय सेवा क्षेत्रातील Northwestern Mutual कंपनीच्या विश्वस्त म्हणूनही काम करत आहेत. कंपनीच्या Audit तसेच Distribution and Technology समित्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. आरती शाह यांचे कार्य केवळ कॉर्पोरेट क्षेत्रापुरते मर्यादित नाही. त्या St. Jude Children’s Research Hospital आणि त्याच्या निधी संकलन संस्थेच्या American Lebanese Syrian Associated Charities (ALSAC) यांच्या संचालक मंडळावरही आहेत. याशिवाय Shrimad Rajchandra Mission Dharampur USA येथे त्या सचिव आणि विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी Indianapolis Public Library Foundation च्या संचालक मंडळावर नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. तसेच Centre for Interfaith Cooperation मध्ये चार वर्षे काम केले.

Nvidia च्या नेतृत्वाबाबत महत्त्वाचा निर्णय
तंत्रज्ञान, डेटा आणि व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रातील आरती शाह यांचा अनुभव Nvidia च्या संचालक मंडळासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कंपनीच्या नेतृत्वाबाबत निर्णय घेताना त्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्याची शक्यता आहे. मात्र, जेन्सेन हुआंग यांची जागा घेणे Nvidia साठी सोपे नसेल. कंपनीच्या प्रचंड वाढीमागे हुआंग यांचे नेतृत्व मोठ्या प्रमाणात कारणीभूत राहिले आहे. हुआंग यांनी तीन दशकांपूर्वी Nvidia ची सहस्थापना केली. सुरुवातीला गेमिंगसाठी ग्राफिक्स चिप्स तयार करणाऱ्या कंपनीला त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI क्षेत्रातील प्रमुख कंपनी बनवले. आज Nvidia चे बाजारमूल्य अंदाजे 4.5 ट्रिलियन डॉलर आहे. हुआंग यांचे योगदान केवळ कंपनीचे व्यवस्थापन करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. कोणत्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करायची, अभियंत्यांच्या संशोधनाचे व्यावसायिक उत्पादनांमध्ये रूपांतर कसे करायचे, यासह इंजिनिअरिंग, गुंतवणूक आणि पुरवठा साखळीशी संबंधित निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्यामुळे Nvidia साठी उत्तराधिकारी शोधणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय वंशाच्या आरती शाह यांच्यासह Nvidia च्या संचालक मंडळाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

follow us