‘विक्रांत काय चीज..दाखवून दिलं’; निवडून येताच जाधवांच्या मुलाचा विरोधकांवर निशाणा…

रत्नागिरी जिल्ह्यातील असगोली जिल्हा परिषद गटात ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत जाधव यांनी विरोधकांना धूळ चारत विजय मिळवलायं.

Vikrant Jadhav

Vikran Bhaskar Jadhav : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा (Zila parishad Election Result) निकाल आज घोषित झाला. बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये भाजपनेच मुसंडी मारली असून बोटावर मोजण्याइतक्या ठिकाणी शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने वर्चस्व स्थापन केलंय. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील असगोली जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विक्रांत जाधव (Vikran Bhaskar Jadhav) यांनी आपलं वर्चस्व स्थापन करीत विरोधकांना धूळ चारलीयं. निवडून येताच विक्रांत काय चीज आहे हे दाखवून दिलं असल्याचं म्हणत जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी विरोधकांवर निशाणा साधलायं.

कारेगाव पंचायत समितीत मनीषा पाचंगे यांच्याकडून निर्मला नवले यांचा दारुण पराभव

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. असगोली जिल्हा परिषद गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत जाधव तर शिंदे गटाकडून संतोष लक्ष्मण जैतापकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून फरहान नजी खान तर अपक्ष उमेदवार अरुण महादेव भुवड मैदानात उतरले होते. या निवडणुकीत विक्रांत जाधव आणि संतोष जैतापकर यांच्यात लढत होणार असल्याचं मानलं जात होतं.

भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत; काय म्हणाले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत?

विजयाची घोषणा होताच जाधव समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. यावेळी विक्रांत जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रत्येक निवडणूक एक वेगळं आव्हान असतं. समोरचे लोकं मला आव्हान समजतच नव्हते, मी कधी त्यावर भाष्यही केलं नाही पण आजच्या निकालाने विक्रांत जाधव काय चीज आहे दाखवून दिलं असल्याचं विक्रांत जाधव यांनी स्पष्ट केलंय.

अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली पवार कुटुंबाची भेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर केलं थेट भाष्य

निवडणुकीच्या निकालामध्ये असगोली जिल्हा परिषद गटात पहिल्या फेरीपासूनच विक्रांत जाधव यांनी आघाडी घेतलेली होती. पहिल्या फेरीत जाधव 1101 मतांनी आघाडीवर होते. तर संतोष लक्ष्‍मण जैतापकर (शिवसेना) – 530, फरहान नजी खान सरगुरो (राष्ट्रवादी काँग्रेस) – 48, अरुण महादेव भुवड (अपक्ष) – 3 अशी उमेदवारांना मते मिळाली. दरम्यान, असगोली जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत जाधव हे विक्रमी मतांनी विजयी झाले असून ते ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे सुपूत्र आहेत. दिलं

follow us