हवामान विभागाने रत्नागिरी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
रायगडावर ढग फुटीप्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झालं होतं.
आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, कोकण, मराठवाड्यातील जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.
मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.
पालघर आणि ठाणे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आज ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे.