आज मुसळधार! दोन जिल्ह्यांना रेड तर ‘या’ नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

आज मुसळधार! दोन जिल्ह्यांना रेड तर ‘या’ नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. राजधानी मुंबई शहरात (Mumbai Rain) आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. अन्य जिल्ह्यांत पाऊस (Maharashtra Rain) कोसळत आहे. राज्यात मान्सून दाखल होऊन एक (Monsoon) महिना झाला आहे. या महिन्याभराच्या काळात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. आताही हवामान विभागाने राज्यातील काही (Weather Update) जिल्ह्यांत आज दिवसभरात जोरदार पाऊस होईल असा इशारा दिला आहे. हवामान विभागाने रत्नागिरी (Ratnagiri) आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Ahmednagar Rain : नगरमध्ये मुसळधार, तर जामखेडमध्ये ढगफुटी; पिंपळवाडीचा पूल खचला

हवामान विभागाने राज्यातील नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यातं अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबई आणि पालघर जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात काल रात्रीपासून काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. काल मध्यरात्री भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. अचानक पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर इतका होता की काही वेळातच लोकांच्या घरात पाणी शिरले. तसेच वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्रास आणखी वाढला होता.

Weather Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

नगर शहरात पुन्हा पावसाची विश्रांती

मागील काही दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील काही (Ahmednagar Rain) भागांत जोरदार बॅटिंग केलीयं. या पावसामुळे पेरणीसाठी तयारीत असेलल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळासा असून पुढील काही दिवसांत पाऊसाने हजेरी लावल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या पावसाची अधिकृत नोंद घेतली जात आहे. मागील पाच दिवसांत पाऊस झालेला नाही. सोमवारी मात्र जोरदार पाऊस झाला होता. दिवसभर पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. यानंतर मात्र पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube