Ahmednagar Rain : नगरमध्ये मुसळधार, तर जामखेडमध्ये ढगफुटी; पिंपळवाडीचा पूल खचला

Ahmednagar Rain : नगरमध्ये मुसळधार, तर जामखेडमध्ये ढगफुटी; पिंपळवाडीचा पूल खचला

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावलीयं, तर काही भागांत पावसाने दडी मारलीयं. अहमदनगर शहरातही (Ahmednagar Rain) मान्सूनने हजेरी लावलीयं. मान्सून सुरु झाल्यानंतर काही दिवस पावसाने पाठ फिरवली पण आता पुन्हा एकदा हजेरी लावलीयं. जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात 14 जुलै रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याचं दिसून आलं. पावसाचा जोर इतका होता की तालुक्यातील पिंपळवाडीचा पूल खचून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरुन जाणारी वाहतूक ठप्प झालीयं.

Neta Geeta Movie: ‘कॉलेजचं राजकारण ते प्रेम प्रकरण’, लवकरच ‘नेता गीता’ सिनेमातून उलगडणार

जामखेड शहरात कालपासून जोरदार पावसाचा जोर सुरु आहे. काल दुपारच्या सुमारास जामखेडमध्ये सर्वदूर पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. तर साकत आणि पिंपळवाडी परिसरात ढगफुटी झाल्याचंच दिसून आलं आहे. या गावांमध्ये ढगफुटी झाल्याने गावाच्या जवळच असेलल्या लेंडी नदीला पूर आला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे हा पूल खचून गेला असून वाहतूक कोंडी झाल्याची परिस्थिती झाली आहे.

Sharad Pawar-Chhagan Bhujbal : शरद पवार- छगन भुजबळ यांच्या भेटीचे राजकीय अर्थ? वाचा सविस्तर….

दरम्यान, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला यामुळे नदीला पूर आला होता यातच पिंपळवाडी जवळील लेंडी नदीवर असलेल्या पुलाला आगोदरच काही ठिकाणी तडे गेले होते. आता तर पुलच खचलेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

अहमदनगरमध्ये आजही पावसाची कृपा..
मागील काही दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने आज अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील काही भागांत जोरदार बॅटिंग केलीयं. या पावसामुळे पेरणीसाठी तयारीत असेलल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळासा असून पुढील काही दिवसांत पाऊसाने हजेरी लावल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या पावसाची अधिकृत नोंद अद्याप झाली नसून मागील दोन तासांपासून नॉनस्टॉप पाऊस सुरुच आहे.

शहरवासियांची तारांबळ
शहरात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडालीयं. शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकीला अडथळा येत आहे. तर काही रस्त्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube