पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशनाआधीच मोठा निर्णय; 10 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार…

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशनाआधीच मोठा निर्णय घेण्यात आलायं, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 663 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळालीयं.

Flood Farmer

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकाकडून मोठा निर्णय घेण्यात आलायं. आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधीच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाएठी उर्वरित रक्कमेच्या मदतीला कॅबिनेटकडून मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तब्बल 663 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीयं. मदत आणि पुर्नवसन मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीवर स्वाक्षरी केलीयं.

ईव्हीएमवरील विरोधकांच्या आक्षेपाला शिंदेंच्या आमदाराची साथ?, स्ट्राँग रुमला दिली खासगी सुरक्षा

मागील काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटका बसला होता. राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या जमीनी अक्षरश: वाहून गेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी सातत्याने लावून धरली जात होती. आता यासंदर्भा सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले असून या पूराच्या फटक्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमीनी, पशूधन, घरेही वाहून गेले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने अधिवेशन सुरु होण्याआधीच शेतकऱ्यांना मदत म्हणून 663 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

‘शंकर जयकिशन’ची तालीम थेट हैदराबादला! महेश मांजरेकर यांच्याकडून डबलशिफ्ट; अभिनेता फहाद फासीलने दिल्या शुभेच्छा

सरकारच्या या निर्णयाचा जवळपास 10 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.

follow us