संतोष देशमुख हत्या प्रकरण, 14 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर येणार आरोपी; न्यायालयाने दिला आदेश

Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी तुरुंगाबाहेर येणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर

Santosh Deshmukh Case

Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी तुरुंगाबाहेर येणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी जयराम चाटे अवघ्या काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार आहे. जयराम चाटे धाकट्या भावाच्या उत्तराकार्यासाठी तरुंगातून बाहेर येणार आहे. यासाठी न्यायालयाने त्याला परवानगी दिली आहे.

 न्यायालयाचा निर्णय काय?

आरोपी जयराम चाटेचा (Jairam Chate) धाकटा भाऊ श्रीराम चाटे यांचा 2 मार्च रोजी निधन झाले असून हिंदू परंपरेनुसार बाराव्याच्या धार्मिक विधीसाठी हजर राहण्यासाठी चाटेच्या वकिलांनी न्यायालयात विशेष अर्ज दाखल करत परवानगी मागितली होती. या प्रकरणावर (Santosh Deshmukh Case) सुनावणी करताना न्यायालयाने जयराम चाटेला सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत पोलीस बंदोबस्तात विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच यावेळी लागणाऱ्या पोलीस बंदोबस्ताचा आणि प्रवासाचा सर्व खर्च स्वत: आरोपीलाच करावा लागणार असून कायदेशीर अटींचे पालन करणे चाटेसाठी बंधनकारक असणार असं आदेशात न्यायालयाने म्हटले आहे.

इराण सहा महिने लढू शकतो…, IRGC ने दिला इस्रायल आणि अमेरिकेला अल्टिमेटम –

धनंजय देशमुखांचा आक्षेप

तर दुसरीकडे आरोपी जयराम चाटे तरुंगातून बाहेर येण्याचा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी विरोध केला आहे. धार्मिक विधीच्या निमित्ताने आरोपी गावत येणार असल्याने तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असं माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले.

follow us