Israel Iran War : इराण सहा महिने लढू शकतो…, IRGC ने दिला इस्रायल आणि अमेरिकेला अल्टिमेटम
Israel Iran War : गेल्या आठ दिवसांपासून अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान युद्ध सुरु असल्याने याचा मोठा फटका आता जगाला बसताना दिसत आहे
Israel Iran War : गेल्या आठ दिवसांपासून अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान युद्ध सुरु असल्याने याचा मोठा फटका आता जगाला बसताना दिसत आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ला करत या युद्धाची सुरुवात केली असून प्रत्युत्तरात इराणने देखील इस्रायल आणि अमेरिकेचा समर्थन करणाऱ्या अरब देशांवर हवाई हल्ले केले आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे युद्ध कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे पुढील सहा महिने आम्ही युद्ध लढू शकतो असा दावा इराणकडून (Israel Iran War) करण्यात आला आहे. तर आम्ही येणाऱ्या काळात आणखी स्प्राईज देणार असल्याचा दावा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने रविवारी फार्स न्यूज एजन्सीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इराणला अमेरिका आणि इस्रायलसोबत किमान सहा महिने तीव्र संघर्षाला तोंड द्यावे लागू शकते.
गार्ड्सचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी म्हणाले, “सध्याच्या कारवायांच्या गतीने इराणच्या इस्लामिक रिपब्लिकचे सशस्त्र दल किमान सहा महिने संघर्ष सुरू ठेवण्यास सक्षम आहेत.” गार्ड्सने दावा केला आहे की त्यांनी संपूर्ण प्रदेशातील 200 हून अधिक अमेरिकन आणि अमेरिकन तळ आणि त्यांच्या सुविधांना टार्गेट केले आहे.
युद्धाचा फटका बसणार अन् पेट्रोल डिझेल महागणार? जाणून घ्या मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया
इस्रायलचा इराणवर हल्ला
तर शनिवारी रात्री इस्त्रायलने इराणच्या तेल साठवण स्थळांवर हवाई हल्ला केल्याने तेहरान आणि कारज शहरात मोठा स्फोट ऐकू आले. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावा इस्त्रायलकडून करण्यात येत आहे.
