युद्धाचा फटका बसणार अन् पेट्रोल डिझेल महागणार? जाणून घ्या मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया

Petrol Diesel Price : गेल्या आठ दिवसांपासून अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचा फटका आता जागतिक अर्थव्यवस्थेला

Petrol Diesel Price

Petrol Diesel Price : गेल्या आठ दिवसांपासून अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचा फटका आता जागतिक अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. भारतासह अनेक देशात गॅस आणि पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याने भारतात एलपीजी गॅसचे दर देखील वाढले आहे. तर आता पेट्रोल आणि डिझेलचे देखील दर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार का? यावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

केंद्र सरकारने या प्रश्नाचे उत्तर देत म्हटले आहे की, सरकारने पेट्रोल ( Petrol Diesel Price) आणि डिझेलसाठीच्या योजनांची रूपरेषा आखली आहे. आपत्कालीन अधिकारांचा वापर करुन तेल कंपन्यांना विशिष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत असं सरकारकडून सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारची योजना काय?

सरकारने म्हटले आहे की, सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांकडे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा तेलाचा साठा आहे. देशांतर्गत बाजारात स्वयंपाकाच्या गॅसची कमतरता सुनिश्चित करण्यासाठी, देशातील तेल शुद्धीकरण कारखान्यांना त्यांची क्षमता वाढवण्याचे आणि अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तिन्ही कंपन्यांकडे पुरेशी आर्थिक क्षमता मध्य पूर्वेतील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल मालवाहतूक थांबविण्यात आली असली तरी, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तात्काळ वाढ होणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या तीन तेल कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला भरघोस नफा कमावला आणि युद्धामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी आर्थिक क्षमता आहे.

रणवीर सेना प्रमुख ब्रह्मेश्वर मुखिया यांच्या नातीला यूपीएससीत यश; मिळवला 301 वा क्रमांक-

2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर

केंद्र सरकारने सांगितले की, 2022 पासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहे. ग्राहकांवर अतिरिक्त भार पडू नये म्हणून तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांसह त्यांचा नफा आणि तोटा संतुलित करत आहेत. परिणामी, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल मालवाहतूक थांबविल्यामुळे तेलाचा तुटवडा आणि वाढत्या किमतींचा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर परिणाम होणार नाही. भारत परिस्थिती आणि संकटाला तोंड देण्यासाठी आधीच तयार आहे असं देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

follow us