Iran America War : आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार; इराणकडून युद्धाची घोषणा; आखाती देशांमध्ये पुन्हा तणाव
Iran America War : अमेरिका आणि इराण दरम्यान पुन्हा एकदा युद्धाची घोषणा झाली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्वतः युद्धाची
Iran America War : अमेरिका आणि इराण दरम्यान पुन्हा एकदा युद्धाची घोषणा झाली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्वतः युद्धाची घोषणा केली आहे. तसेच इराणने कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर बंदर अब्बाससह अनेक भागांत स्फोटांचे आवाज ऐकू आले. होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करण्यात आली आहे.
दक्षिण इराणवर जोरदार हल्ले
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार, इराणवर गेल्या दहा दिवसांपासून हल्ले सुरु करण्यात आले आहे. दहाव्या दिवशीही दक्षिण इराणमध्ये आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेकडून हल्ले सुरु आहे. या हल्ल्यानंतर बंदर अब्बास, बुशेहर, इस्फहान, चाबहार आणि कोनारक यांसारख्या अनेक ठिकाणी स्फोट झाले.
मसूद पेझेश्कियान यांची पूर्ण युद्धाची घोषणा
या हल्ल्यानंतर इराणच्या लष्कराने मंगळवारी सकाळी कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळाला टार्गेट करुन क्षेपणास्त्रे डागली. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी जाहीर केले की अमेरिकेसोबत आता पूर्ण-प्रमाण युद्ध सुरू झाले आहे. कुवेतमधील ‘आरिफजान’ तळावर तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यावर हा हल्ला झाला. या लष्करी तळावर तैनात असलेल्या अमेरिकेच्या ‘हायमार्स’ (HIMARS) क्षेपणास्त्र प्रणालीवर जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी प्रहार केला.
कुवेतमध्ये अमेरिकन क्षेपणास्त्र प्रणालीवर हल्ला
अमेरिकेची ‘हायमार्स’ क्षेपणास्त्र प्रणाली ही वेगाने हालचाल करण्यास आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम अशी फिरती यंत्रणा आहे. इराणच्या हल्ल्यात या प्रणालीचे मोठे नुकसान झाले आहे. कुवेत शहराच्या दक्षिणेस असलेले ‘कॅम्प आरिफजान’ हे अमेरिकन हवाई दल, नौदल, मरीन कॉर्प्स आणि कोस्ट गार्डसाठी एक अत्यंत महत्त्वाचा लष्करी तळ आहे. मात्र, इराणच्या हल्ल्यांनंतर कुवेतने या तळावरील देखरेख आणि सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. कुवेतने इराणच्या हल्ल्यांचा तीव्र निषेधही केला आहे.