‘शेती वगैरे काही नाही, राजकारण हाच आपला मुख्य व्यवसाय; बाकी सगळे जोडधंदे’; प्रीतम मुंडेंच्या विधानाची चर्चा!

Pritam Munde Statement: बीड जिल्ह्यात राजकारणाला किती महत्त्व आहे, हे सांगताना माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी मिश्किल टिप्पणी केली.

Pritam Munde Statement: बीड जिल्ह्यात राजकारणाला किती महत्त्व आहे, हे सांगताना माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी मिश्किल टिप्पणी केली.

Pritam Munde Statement Beed Politics: बीड जिल्ह्यात राजकारणाला किती महत्त्व आहे, हे सांगताना माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. ‘बीडचा प्रमुख उद्योग राजकारण आहे आणि बाकीचे सगळे जोडधंदे आहेत. इथल्या प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाच्या नसानसात राजकारण भरलेलं आहे,’ असं त्या म्हणाल्या. अंबाजोगाई येथील एका उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Delimitation Bill : पवारांच्या राष्ट्रवादीत पहिला राजीनामा पडला; विचारांशी केलेली गद्दारी…

कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं प्रीतम मुंडे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. ‘मी केवळ माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी इथे आले आहे. याचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. मात्र, एवढे लोक व्यासपीठावर असताना राजकारणाची चर्चा होणार नाही, असं होऊच शकत नाही,’ असं त्या म्हणाल्या.

बीडमधील राजकीय वातावरणावर बोलताना त्यांनी पुढे म्हटलं, ‘शेती हा आपला प्रमुख व्यवसाय नाही, तर राजकारण हाच आपला मुख्य व्यवसाय आहे. जगात इतर ठिकाणी काय घडेल, हे सांगता येत नाही. पण बीडमध्ये प्रत्येक गोष्टीचे पडसाद उमटतात. कोणतंही आंदोलन असो किंवा धरणे आंदोलन असो, ते बीडमध्ये झाल्याशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही.’

बीडमध्ये प्राध्यापकाचा संतापजनक प्रकार! विद्यार्थिनीचा विनयभंग, नापास करण्याची धमकी दिल्याचा आरोप

‘मला निवडणुकीसाठी मत मागायचं नाही’

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांची नावं आधीच घेतली असल्याने पुन्हा कोणाचा उल्लेख करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘मला निवडणुकीसाठी तुमच्याकडे मत मागायचं नाही. मी इथे केवळ कार्यकर्त्यांसोबतचे ऋणानुबंध जपण्यासाठी येत असते. मला कार्यकर्त्यांशिवाय करमत नाही आणि त्यांनाही माझ्याशिवाय करमत नाही. यामागे कोणताही राजकीय हेतू नाही,’ असं प्रीतम मुंडे यांनी स्पष्ट केलं.

डिलिमिटेशन व्हायलाच हवं, पण सरकारची पद्धत चुकीची; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे स्पष्टच बोलले!

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी दिली होती. त्यावेळी प्रीतम मुंडे यांनी बहिणीच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना विजय मिळवता आला नव्हता. या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांच्या ताज्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

follow us