एमआयएमने आज विधानसभेसाठी पाच उमेदवार जाहीर केले. इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्यासह आणखी 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
मुंबई दौऱ्यादरम्यान शाहंनी भाजप नेत्यांसह महायुतीतील नेत्यांना महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत अशा सूचना केल्या आहेत
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत शाहंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा केली.
ज्या पक्षाने कुटुंब फोडलं त्यांना त्याचा जाब विचारण्याची हिंमत अजितदादांमध्ये आहे का? अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.
अजित पवार हे बारामतीतूनच लढणार. लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक प्रकारची कला आहे. - जितेंद्र आव्हाड
हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
बऱ्याच लोकांना सद्बुद्धीची गरज आहे, त्यांना गणरायाने सद्बुद्धी द्यावी, असे म्हणत फडणवीसांना विरोधकांना खोचक टोला लगावला.
येस, हो. मलाही भविष्यात राजकारणात यायला आवडेल, असं म्हणत अभिनेत्री मानसी नाईकने (Mansi Naik) राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत.
जनता महागाईने, फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त असून, येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
अर्थखात्यासारख नालायक खातं नाही. दहा वेळा माझी फाईल अर्थखात्याकडून माघारी आली. वारंवार फाईल निगेटिव्ह होऊन यायची