Video : तुम्हाला लोकांनी का संधी द्यावी?, राष्ट्रवादीच्या मिलिंद वाळंजकरांनी सांगितला विकासाचा प्लॅन

मुळशी तालुक्यातील पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद वाळंज यांनी विकासाचा प्लॅन मांडला.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 04T180215.305

सर्व सामान्य माणसांसाठी काम करायचं आहे. (Mulshi) परंतु, काही रिसॉर्ट पर्यावरणाला हानिकारक ठरतात या प्रश्नावर, आम्ही सर्व ठिकाणी पर्यावरणपुरक काम केले आहेत. यामध्ये कोणत्याच पातळीवर पर्यावरणाला हानी पोहचणार नाही असं मत मुळशी तालुक्यातील पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद वाळंज यांनी मांडल. ते लेट्सअप मराठीवर बोलत होते. यावेळी त्यांनी मुळशीमधील भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणच्या शैक्षणिक सुविधा, रोजगार, महिला सक्षमीकरणाबद्दलचे त्यांचे व्हिजन काय आहे? यावर संवाद साधला.

आता या भागात सगळ काही व्हिआयपी परिस्थिती निर्माण होत असेल तर स्थानिक प्रश्नांना वाव मिळतो का? आणि त्यातून रस्ते, रोजगार असा उपयोग होतो का ? त्यावर बोलताना वाळंज म्हणाले, या गोष्टींचा नक्कीच विकास होतो. त्याचबरोबर स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी काही काम करणार आहात का यावर बोलतना ते म्हणाले लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव हा त्यामधील महत्वाचा प्रश्न आहे. हे सगळं गृहीत धरून लोकांना काही गोष्टींची जनजागृती करावी लागेल, त्यानंतर हे सगळं होईल असं ते म्हणाले.

Milind Valanj Exclusive : तेव्हा अजितदादांशी पहिली भेट अन्, मिलिंद वाळंजने सांगितला तो किस्सा

जगाच्या नकाशावर उठून दिसेल असं मुळशीचं सौंदर्य आहे, हे सगळ बरोबर आहे. हे करत असताना लोकांना त्या त्या पातळीवरच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. बालिसोबत स्पर्धा करण्याची क्षमता येथे आहे असंही ते म्हणाले. तसंच, माझ्याकडं माझ्या भागाच्या विकासाचा एक प्लॅन आहे तो मी मला संधी मिळाली तर राबवणार आहे. तसंच, राष्ट्रवादी पक्षाची लाईनच आहे की कार करत आहोत काम करत राहू तसं आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत असंही ते म्हणाले.

यामध्ये विमा योजना काय आहे आणि का सुरू केली यावर बोलताना ते म्हणाले, जे तरुण रोज नोकरी निमित्ताने ये जा करतात. त्यांच्यातील कुणाच्या वाट्याला अपघात आला तर त्यांच्या कुटुंबाला आधार म्हणून आपण हा 10 लाख रुपयांचा विमा सुरु केला आहे असंही ते म्हणाले. त्याचबरोबर वारकऱ्यांच्या पारंपारिक खेळासाठी एक मोहत्सवही घेतल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर मुळशी हा डोंगराळ तालुका आहे, आरोग्याची समस्या आहे. यासाठी आम्ही एकाच ठिकाणी नाही तर गावोगाव आम्ही आरोग्य शिबीर घेतले, ज्याचा लोकांना थेट त्याचा फायदा झाला असंही मिलिंद वाळंज यावेळी म्हणाले.

follow us