पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी सोबत येणार असतील तर आम्ही…, काँग्रेस नेते वडेट्टीवारांची मोठी घोषणा
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्याताली दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीबाबत वक्तव्य केलं असून काँग्रेसच धोरण जाहीर केलं.
पुण्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र येणार अशी चर्चा रंगलेली आहे. तशा रोज दोन्ही बाजूने बैठकाही सुरू आहेत. मात्र, आता काँग्रेसने मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष घड्याळावर लढणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत न जाता स्वबळावर लढणार आहोत अशी घोषणा वजा इशाराच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
समविचारी पक्ष असतील त्यांच्याशी युती करण्याचे आम्हाला वरिष्ठांकडून आदेश आहेत. वंचितसोबत चर्चा सुरु आहे. आज आणि नाही तर उद्या यावर निर्णय होईल. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात लक्षात प्रत्येकाने दोन पावले मागे घ्यावेत असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांची ती मागणी अन् दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली! नेमकं काय घडलं?
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घड्याळावरुन लढायचे की तुतारी असा वाद सुरु असल्याचे कळतं.परंतु, त्यांच्या घरात आम्ही डोकावत नाहीत. मात्र, ते जर एकत्र आले तर पुण्यात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
राज्यात कोणचा पायपोस कोणात नाही. इतक्या आघाड्या आणि युत्या होत आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे. जनता हे सर्व पाहात आहे असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. दरम्यान, पुणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोठे नेते आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी नुकताच पक्षातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करण्याच्या विषयावर नाराजी व्यक्त करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
