अजित पवारांची ‘ती’ मागणी अन् दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली! नेमकं काय घडलं?
NCP alliance दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा फिस्कटली असल्याचं सांगितल जात आहे. याला अजित पवारांनी केलेल्या मागणीचं कारण दिलं जात आहे.
Both NCP alliance collapsed due to Sharad Pawar not agree on Ajit Pawar Demand : मागील बऱ्याच दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी(NCP) आगामी महापालिका निवडणूका सोबत लढवणार असल्याचा चर्चा होत्या. शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या वतीने शुक्रवारी अंकुश काकडे, बापू पठारे, प्रकाश म्हस्के आणि विशाल तांबे यांनी राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पुणे अध्यक्षांची भेट घेतली. मात्र या चर्चेतून काही समोर आलेलं नाही. उलट ही युती फिस्कटली असल्याचं सांगितल जात आहे. याला अजित पवारांनी केलेल्या मागणीचं कारण दिलं जात आहे.
अजित पवारांची ‘ती’ मागणी अन् दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली!
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. यासाठी शुक्रवारी अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी अजित पवारांकडून एक मागणी करण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, दोन्हीही राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर लढतील. मात्र हे शरद पवार यांना मान्य नव्हतं. शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या तुतारी या चिन्हावर ठाम आहे. यावरून दोन्हीही पक्षांमध्ये मतभेद झाला आणि अखेर दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली असल्याचं सांगितलं जात आहे.
शनी आणि चंद्राच्या विष योगाने उलथा पालथीचे संकेत! जाणून घ्या बाराही राशींचे राशी भविष्य…
या चर्चेनंतर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवार यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीबाबत चर्चा केली. असं देखील समोर आलं आहे. त्यामुळे जर पुण्यामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येणार नसतील. तर ठाण्यामध्ये काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची देखील एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यामुळे एकीकडे अजित पवारांची राष्ट्रवादीशी युती फिस्कटल्यानंतर पवारांनी पुन्हा महाविकास आघाडीकडे यु टर्न घेतला आहे का? असे देखील बोलले जात आहे. मात्र महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली? याची माहिती समोर आलेली नाही.
