Video : अजितदादांचा अपघात नाही, घातपात! रोहित पवारांचा खळबळजनक दावा, पाहा व्हिडिओ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नुकतच विमान अपघातात निधन झालं. (Ajit Pawar) त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते कार्यकर्ते आणि इतर सामान्य लोकांनाही अनेक प्रश्न पडत आहेत. असेच प्रश्न आणि शंका आल्याचं अजित पवार यांचे पुतणे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही बोलून दाखवल्या होत्या. आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या निधनाबद्दल माहिती दिली. त्यांनी यावेळी फक्त तोंडी माहिती दिली नसून पीपीटी प्रेजेंटेशनद्वारे स्क्रिनवर त्यांनी अनेक गोष्टी तथ्यांच्या आधारावर दाखवून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
गेल्या 13 ते 14 दिवसांत अदित दादांच्या अपघाताची कुठलीच चौकशी झालेली नाही. हा जो अपघात झाला तो कधी अपघात होतो त्यापेक्षा थोडा वोगळा होता त्यामुळे शंका वाढली. दुर्दैव म्हणजे हे सगळं घडूनही या वीआरएस कंपनीला आणखीही परवाणगी दिली आहे. त्यामुळे या तपासात उशीर झाला म्हणून खोटे अहवाल सादर होण्याची शक्यता आहे.
या वीआरएस कंपनीच्या विमानाला 2023 ला जो अपघात झाला होता, त्याची चौकशी आज तीन वर्ष होत आले तरी झाला नाही असाही थेट आरोप रोहित पवार यांनी केला. त्याचबरोबर हे विमान 16 वर्ष जून होत. ते का इतक्या हाय प्रोफाईल व्यक्तीला वापरलं असाही प्रश्न रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ही कंपनी कागदपत्रांवर छेडछाड केल्याच्याही घटना घडल्यात असंही ते म्हणाले.
हे विमान तसं हवेतच इकडे तिकडं होऊन कोसळलं आहे. त्यामुळे यांच्याबद्दल आम्हाला शंका आहे. इतका मोठा अपघात झाल्यानंतरही या वीआरएस कंपनीत मुख्यमंत्र्यांसारखी व्यक्ती प्रवास करते. हे कसं? आजही फक्त विमान कोसळल इतकेच सीसीटीव्ही मिळाले आहेत इतर का नाही असंही रोहित पवार यावेळी म्हणाले. त्याचवेळी या कंपनीचा मालक म्हणतो विमान ठिक होतं, पुढे काही दिसत नसल्याने अपघात झाला असावा असं ते म्हणतात.पण हे विमान 16 वर्ष जून होत हे कस नाकारणार असंही ते म्हणाले.
