विलीनीकरणाच्या प्रक्रियेत मी सहभागी, तेराव्या दिवशी सगळं सांगणार, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

पक्ष विलीनीकरणाच्या चर्चांवर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून 13 दिवसांनंतर सगळं सांगणार असल्याचं जाहीर केलं आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (356)

Rohit Pawar’s big revelation : अजित पवार यांच्या अकाली निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या एका कट्टर समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावचे रहिवासी सुदाम बोडके असे मृत समर्थकाचे नाव आहे. अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी ऐकताच सुदाम बोडके यांना तीव्र धक्का बसला आणि त्यांची प्रकृती अचानक खालावली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची बातमी समजताच बोडके हे प्रचंड अस्वस्थ झाले होते. “ही बातमी खरी आहे की स्वप्न, हेच कळेनासं झालं होतं,” असं कुटुंबीयांनी सांगितलं. अजित पवारांशी असलेली भावनिक आणि राजकीय नाळ यामुळे हा धक्का ते सहन करू शकले नाहीत. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

अजित पवारांच्या निधनामुळे आधीच शोकसागरात असलेल्या बोडके कुटुंबावर त्यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका बाजूला नेत्याच्या जाण्याचं दु:ख आणि दुसऱ्या बाजूला घरातील कर्त्या व्यक्तीचा अचानक झालेला मृत्यू, या दुहेरी आघातामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे नेते रोहित पवार यांनी ढकांबे येथे जाऊन बोडके कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा करत त्यांचे सांत्वन केलं. “पवार कुटुंब आणि बोडके कुटुंब दोघेही आज दु:खात आहेत. ही हानी भरून न येणारी आहे,” असं रोहित पवार यावेळी म्हणाले.

Stock Market : केंद्र सरकारचा गुंतवणूकदारांना धक्का अन् सेन्सेक्स 1,547 अंकांनी घसरला

याच भेटीदरम्यान रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना पक्षातील अंतर्गत घडामोडींवरही भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत अजित पवार यांच्याशी काय चर्चा झाली होती, याबाबत स्पष्ट भूमिका घेत त्यांनी सांगितलं की, “या सगळ्या प्रक्रियेत मी स्वतः सहभागी होतो. मात्र यासंदर्भात सविस्तर माहिती मी तेरा दिवस पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सांगेन.”

ते पुढे म्हणाले, “आता हा काळ राजकीय बोलण्यासाठी नाही. सध्या शोक व्यक्त करणं आणि कुटुंबांच्या पाठीशी उभं राहणं हेच योग्य आहे.” त्यांच्या या विधानातून राजकीय संकेत तर मिळालेच, पण सध्या भावनिक वातावरण पाहता संयम राखण्याचा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला. एकीकडे अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असताना, त्यांच्या समर्थकाच्या मृत्यूने या दुःखाला आणखी एक वेदनादायी पदर जोडला आहे. ही घटना अजित पवार यांच्याशी कार्यकर्त्यांची असलेली भावनिक नाळ किती खोल होती, याचंही विदारक चित्र समोर आणते

follow us