मोठी बातमी : बारामती विमानतळासाठी 65 कोटींचा निधी मंजूर; अजित पवारांच्या अपघातानंतर निर्णय
Baramati Airport: मंजूर झालेल्या निधीतून धावपट्टीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच विमानांच्या सुरक्षित लँडिंग आणि टेक-ऑफसाठी धावपट्टीच्या शेवटी आवश्यक सुरक्षा क्षेत्र विकसित केले जाणार आहे
Baramati Airport : बारामती विमानतळाच्या (Baramati Airport) विकासकामांना गती मिळणार असून, पहिल्या टप्प्यातील 65 कोटी रुपयांच्या कामांना राज्य सरकारने मंजुरी दिलीय. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर (Deepak Kapoor) यांनी एक्सवरून ही माहिती दिलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर विमानतळावरील पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या मुद्दे चर्चेत आले होते. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
HUGE NEWS FOR BARAMATI AIRPORT … 1….after lot of hard work , we today got Govt approval for phase 1 of development work at Baramati Airport worth Rs 65 CR —- this includes Recarpeting of runway / Construction of runway n safety area / area grading / compound wall / Atc tower /
— Deepak Urmil Shiv kapoor IAS (@Deepakk75058621) October 29, 2026
मंजूर झालेल्या निधीतून धावपट्टीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच विमानांच्या सुरक्षित लँडिंग आणि टेक-ऑफसाठी धावपट्टीच्या शेवटी आवश्यक सुरक्षा क्षेत्र विकसित केले जाणार आहे. विमानतळ परिसरातील जमिनीचे सपाटीकरण, सीमाभिंतीची उभारणी आणि हवाई वाहतूक नियंत्रणासाठी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) नवीन टॉवर उभारण्याचाही या कामांमध्ये समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीची कारवाई, मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे अडकला
या विकासकामांमुळे बारामती विमानतळावरील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. धावपट्टीची स्थिती, विमानांच्या हालचालींसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा या विमानतळाच्या कामकाजातील महत्त्वाच्या बाबी आहेत.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत ट्विस्ट ! कोरभअभावी सभा तहकूब पण चुयेकरांची अध्यक्षपदी निवड
दीपक कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामांसाठी राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामांना सुरुवात कधी होणार आणि ती किती कालावधीत पूर्ण होणार, याकडे लक्ष लागले आहे.