मला शंकाही आहे कदाचित हा घातपात असू शकतो; रोहित पवारांनाही वेगळाच संशय
Rohit Pawar: Rohit Pawar : तसेच व्हीएसआर विमान कंपनीवर रोहित पवारांनी (Rohit Pawar) गंभीर आरोप केले आहेत.
Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा बारामती विमानतळावर विमान कोसळून मृत्यू झालाय. या अपघातावर वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे दावे केले आहेत. तसेच व्हीएसआर विमान कंपनीवर रोहित पवारांनी (Rohit Pawar) गंभीर आरोप केले आहेत. मलाही शंकाही कदाचित हा घातपात असू शकते, असा संशय रोहित पवारांना व्यक्त केलीय.
अपघातग्रस्त विमान हे 16 वर्ष जुनं होतं.अपघाताच्या दोन दिवस आधी हे विमान मुंबई ते सुरत आणि सुरत ते मुंबई असे जावून आले होते,असा दावाही रोहित पवारांनी पुराव्यासह केलाय.
वेगवेगल्या सरकारी अहवालातील वेळेची विसंगती
केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आणि एटीसी ट्रॉन्सस्क्रीप्टमधील विसंगती
दोन्हीमध्ये एका मिनिटाची विसंगती दिसत असली तरी एक मिनिट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. विमानप्रवासात सेकंदाला किमत असते (चार पाच सेकंदात विमान कोसळते ) लेजरजेट 45 विमान 1 तासात 860 किलोमीटर तर एका मिनिटात जवळपास 15 किलोमीटर अंतर कापते.
को-पायलट का ओरडली?
को पायलट शांभवी पाठक यांचा 8.44 वाजता एक आवाज आला. तो आवाज ओ शीट ओ शीट असा होता. मुख्य पायलट झोपला होता का ?
पायलटकडून रनवे नंबर 11 चा आग्रह का ?
8.27 मिनिटाला-एअरक्राफ्टकडून रनवे 29 ची परवानगी मागण्यात आली. एटीसीकडून परवानगी रनवे 29 साठी देण्यात आली.
8.29-एअरक्राफ्टकडून रनवे 11 ची परवानगी मागण्यात आली. एटीसीकडून परवानगी रनवे 11 साठी देण्यात आली.
8.36 विमानाने गो आराउंड केल्यानंतर पुन्हा रनवे 29 मागण्यात आले.दृश्यमानता कमी असताना विमान का उतरविले ? असा दावा रोहित पवारांनी केलीय.
विमान उतरविण्यासाठी दृश्यमानता किमान 5 किलोमीटर असणे गरजेचे आहे. दृश्यमानता कमी होती तर 8.31 ला विमान तिथून परत पुण्याकडे नेण्यात का नेले नाही.
