गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबाला जेलमधून निवडणूक लढविण्यास न्यायालयाची परवानगी, कोणत्या अटी पाळाव्या लागणार ?
Pune Municipal Corporation (PMC) Election 2025: कुख्यात गुंड बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर व सून सोनाली आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात.
Pune Municipal Corporation (PMC) Election 2025: टोळी युद्धातून नातू आयुष कोमकरची हत्या केल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर, (Bandu Andekar) त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर व सून सोनाली आंदेकर हे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) Election 2025) रिंगणात उतरणार आहेत. या तिघांना निवडणूक अर्ज दाखल करण्याची सशर्त परवानगी पुण्याच्या विशेष मोक्का न्यायालयाने शुक्रवारी दिलीय. तिघेही शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. या तिघेही कोणत्या पक्षाकडून निवडणुकीचा रिंगणात उतरणार आहे हे निश्चित झालेली नाही. (Pune Municipal Corporation (PMC) Election 2025: Court allows notorious gangster Bandu Andekar and two others to contest elections from jail)
ब्रेकिंग : पवारांच्या एकनिष्ठ शिलेदाराची ‘पंजा’शी हातमिळवणी; जगतापांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
भाजपने केरळमध्ये रचला इतिहास; तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत पहिल्यांदा महापौर
बंडू आंदेकसह भावजय माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली यांच्यासह बारा जण न्यायालयीन कोठडीत आहेत. पुणे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज भरले जात आहे. निवडणूक लढविण्यासाठी तिघांकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. शुक्रवारी या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर पुण्याच्या विशेष मोक्का न्यायालयाने तिघांनाही निवडणूक लढविण्यासाठी हिरवा कंदिल दाखविला आहे. निवडणूक लढविण्याची परवानगी देताना काही न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणतीही मिरवणूक, प्रचार यात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक भाषणे करू नये, अशी ताकिद न्यायालयाने दिलीय. या सर्वांना पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नेले जाणार आहे.
मोठी बातमी; मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित; आकडा समोर
ब्रेकिंग : पवारांच्या एकनिष्ठ शिलेदाराची ‘पंजा’शी हातमिळवणी; जगतापांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
टोळीयुद्धातून आयुषला संपविले
माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून झाला होता. त्यानंतर बदला म्हणून नातू आयुष कोमकरला गोळ्या झाडून संपविण्यात आले होते. 5 सप्टेंबर 2025 रोजी आयुषची निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणी टोळीप्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकरसह कुटुंबातील नऊ सदस्य आणि हत्यारे पुरविणारे तिघे असा पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, बंडू आंदेकरची मुलगी वृंदावनी हे न्यायालयानीन कोठडीत आहेत. बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केलाय.
