मोठी बातमी! माजी आमदार राम सातपुतेंना मारण्याच कट, भाजप मंत्र्याचा गंभीर दावा

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे पराभव हा अंतिम नसतो आणि विजयी अंतिम नसतो.कामात सातत्य असले पाहिजे.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 10T215302.727

भाजप मंत्री जयकुमार गोरे यांनी खळबळ दावा केला आहे. जे मला गुंड म्हणत आहे, तेच सर्वात मोठे गुंड आहेत. (Gore) आज माळशिरसमध्ये बघा कुठल्या पद्धतीचे वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे. ज्या पद्धतीने भाजपला मते मिळाली ते बघून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण आणि दमबाजी झाली आहे. त्याठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून त्यांच्या खुनाचा कट होता असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.  पोलीस याचा योग्य तो तपास करीत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

हा कट कोणी रचला होता, ते भविष्यात पोलीस तपासात समोर येईलच.याप्रकरणामागे कोणता गुंडा आहे. हे समोर येईलच त्यानंतर आपण चर्चा करू असेही जयकुमार गोरे यावेळी म्हणाले. चौकशी झालीच पाहिजे असं आमचं देखील मत आहे. त्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. त्यामुळे त्याबाबतीत अधिकच बोलणं योग्य नाही. चौकशीसाठी कुठली एजन्सी असली पाहिजे. याचा निर्णय सुरक्षा एजन्सी घेतील.तपास यंत्रणा राज्य आणि केंद्र सरकार ठरवतील असेही गोरे यांनी यावर प्रतिक्रीया देताना सांगितले.

Video : रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघाताची पुराव्यासह वाईट वेळ सांगितली

पराभव झाल्यानंतर कारणे सांगण्याची मला सवय नाही. पराभव का झाला याचं विश्लेषण मी करणार नाही, मात्र झालेला पराभव मी स्वीकारतो. सोलापूरकडं लक्ष होतं, त्यामुळे साताऱ्याकडं दुर्लक्ष झालं हे खरं आहे. केवळ दुर्लक्ष होणं हे एकमेव पराभवाचं कारण नाही, असं अनेक पराभवाचे धक्के मी स्वीकारलेले आहेत. या धक्क्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. राजकारणातून प्रत्येक जण अशा पराभव होऊनच पुढे जातो. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे पराभव हा अंतिम नसतो आणि विजयी अंतिम नसतो. कामात सातत्य असलं पाहिजे.

पालकमंत्री अपयशी झाल्यानंतर काय करायचं, याचाही प्लॅन आखला गेला होता. जर बहुमत नाही मिळालं तर कोणाला सोबत घ्यायचं याचाही प्लॅन केला गेला होता. पक्ष आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्लॅन होता. पक्षापेक्षा आम्ही कसे मोठे आहोत हे दाखवण्याचा काही जणांचा प्रयत्न होता. पण मी भाजपच्या कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानतो. कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता ते आमच्या मागे उभे राहिले असेही गोरे यावेळी म्हणाले

follow us