पगार जिल्हा बँकेकडून अन् चाकरी दुसऱ्याची; राम सातपुतेंकडून थेट मोहिते पाटलांच्या पीएचे गौडबंगाल उघड

  • Written By: Published:
पगार जिल्हा बँकेकडून अन् चाकरी दुसऱ्याची; राम सातपुतेंकडून थेट मोहिते पाटलांच्या पीएचे गौडबंगाल उघड

Ram Satpute and Ranjitsinh Mohite-Patil : लोकसभा निवडणुकीपासून मोहिते पाटील कुटुंब आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यामध्ये जोरदार राजकीस संघर्ष सुरू आहे. माळशिरस मतदारसंघातून विधानसभेला पराभूत झाल्यापासून राम सातपुते हे मोहितेंवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. रणजितसिंह मोहित पाटील हे भाजपकडून (BJP) विधानपरिषदेचे सदस्य असतानाही त्यांनी पक्षाविरोधात काम करून माझा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी सातपुते यांनी पक्षाकडे केली होती. त्यानंतर पक्षाने रणजितसिंह मोहिते यांना नोटीस बजावली आहे. आता तर सातपुते यांनी मोहिते पाटलांच्या पीएचे गौडबंगाल उघडकीस आणले आहे. जिल्हा बँकेचा एक कर्मचारी रणजितसिंह मोहितेंचा पीए म्हणून काम करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. आता या कर्मचाऱ्याची थेट दूरच्या तालुक्यात बदली करण्यात आली आहे.

राजकारणात फक्त ‘युज अँड थ्रो’ केले जाते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत..

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव शाखेत एच. बी. शेटे हे लिपिक म्हणून कार्यरत होते. परंतु बँकेची शाखेची जबाबदारी पार पाडण्याएेवजी तो अनेक वर्षांपासून रणजितसिंह मोहिते पाटील यांचा पीए म्हणून काम पाहात होता. याबाबतची तक्रार सातपुते यांच्याकडून जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून करण्यात आली होती. शेवटी 2 जानेवारी रोजी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी शेटे यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. त्यांची आता बँकेच्या अक्कलकोट शाखेमध्ये लिपिक म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यावरून सातपुते यांनी मोहितेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी जिल्हा बँक बुडवून खाल्ली. त्याच जिल्हा बँकेचे कर्मधारी शेटे हे अनेक वर्ष रणजितसिंह मोहिते यांचे पीए म्हणून काम करत होते. पगार जिल्हा बँकेकडून आणि चाकरी मोहितेंची असे सातपुते यांनी म्हटले आहे.

मोठी बातमी! बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेंसह तिघांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी…


कारखान्याची शेतकऱ्याला नोटीस, सातपुतेंनी घेरले

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याने गारअकोले (ता. माढा) येथील शिवाजी नाना वाळेकर ऊस उत्पादकाला एक नोटीस पाठविली आहे. या शेतकऱ्याने कारखान्याकडे तीन एकर उसाचे नोंद केली. परंतु या शेतकऱ्याने मोहिते कारखानाला ऊस न देतो, दुसऱ्या कारखान्याला ऊस दिला आहे. त्यावरून ही तोंडणी थांबवून तो ऊस मोहिते कारखान्याला द्यावा, अन्यथा सहकारी संस्था अधिनियमानुसार तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी नोटीस मोहिते पाटील कारखान्याने संबंधित शेतकऱ्याला दिली आहे. त्यावर राम सातपुते यांनी मोहिते यांना चांगलेच घेरले आहे. सहकारी साखर कारखाना कुणाची खानदानी संपत्ती नसते तर तो शेतकऱ्यांचा व सभासदांच्या मालकी हक्काचा असतो. चेअरमन व संचालक हेकारखान्याचे मालक नसतात तर सभासदांनी कारखाना चालवण्यासाठी त्यांच्यातूनच संचालक म्हणून निवडून दिलेले असतात. सर्व संचालक मिळून चेअरमन ची निवड करतात. मात्र शंकरनगरच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील आहेत. त्यांनी आपणच कारखान्याचे मालक आहोत. या अविर्भावात कारखान्याच्या सभासदांनी कारखान्याकडे नोंद असणारा ऊस सदर कारखान्याकडून दर कमी मिळत आहे. त्यामुळे इतर कारखान्याकडे ऊस गाळपास पाठविल्यानंतर संबंधित सभासदांना नोटीस देऊन कारवाई करण्याच्या धमक्या कारखान्याच्या मालकाला म्हणजेच सभासदांना दिल्या हे कितपत योग्य आहे ? असा सवाल राम सातपुते यांनी केला आहे.

पतसंस्था बुडवून खाल्ली उद्या कारखाना विकून खाल्ला तर
जिल्ह्यात सर्वात कमी दर तुमच्या कारखान्या, तुम्ही कारखाना सुरू होण्यापूर्वी किंवा सुरू झाल्या झाल्या उसाचे दर घोषित करीत नाहीत. कारखान्याने गेल्यावर्षी शेतकऱ्यांना फक्त २६०० रुपये दर दिला तर इतर कारखान्याचा २८०० – ३००० हजार दर आहे. तुम्ही कारखान्याच्या कामगाराचे पगार वेळेवर करीत नाही. उलट स्वतःच्या जन्मदिनानिमित्त कामगारांचे पगार कपात करून त्यांच्याकडून 75 तोळे सोने कारखान्याचे चेअरमन घेतात वा रे वा काय न्याय आहे. तुम्ही सुमित्रा पतसंस्था बुडवून खाल्ली उद्या कारखाना विकून खाल्ला आणि बिलच भेटलं नाही तर शेतकऱ्यांनी कुणाच्या दारात जायचं ?
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे कामगार चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या स्वमालकीच्या सयाजीराजे वॉटर पार्कवर सभासदांच्या पैशातून काम करतात आणि या वॉटर पार्कचा सर्व मलिदा चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांना मिळतो. मग शेतकऱ्यांनी या कारखान्यास ऊस देऊन स्वतःचा तोटा करून का घ्यावा ? असे राम सातपुते यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube