मोठी बातमी! बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेंसह तिघांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
Santosh Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह (Sudarshan Ghule) तीन जण फरार होते. त्या आरोपींना आज पकडण्यात आले. दरम्यान, या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे (Sudhir Sangle) आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपीना १४ दिवसांची सीआयडी (CID) कोठडी सुनावण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.व्ही. पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली. या तीन आरोपींना 25 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे.
‘अजितदादा क्या हुआ तेरा वादा…’, सुरेश धसांचा परभणीतून हल्लाबोल, मुडेंनाही सुनावलं…
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पंचवीस दिवसांनंतर तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. देशमुख यांची हत्या करून आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे फरार झाले होते. तर आरोपींना संतोष देशमुख यांच्याविषयी माहिती देणारा सिद्धार्थ सोनवणे हाही फरार होता. या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली. सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत आवळल्या. त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद झाला आणि त्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी वकिलांनी आज बाजू मांडतांना म्हटलं की, या आरोपींकडून दहशत माजवून खंडणी मागितली जात असल्याने या भागात नवीन उद्योग येत नहाीत. तसंच संघटीतपणे आरोपींकडून गुन्हेगारी सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. ही विनंती मान्य करत न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
आरोपी जाळ्यात कसे अडकले?
आरोपींना मदत करणारे डॉ. संभाजी वायभसे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याच चौकशीत या आरोपींचा ठावठिकाणा कळाल्याचं सांगण्यात येतं. त्या माहितीच्या आधारे पोलीस व विशेष पथकाने सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेला अटक केली. या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर संतोष देशमुखचा ठावठिकाणा उघड करणारा तिसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याला कल्याण येथून ताब्यात घेण्यात आले.
सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोग येथील रहिवासी आहे. सरपंचाच्या हत्येनंतर तो गावातच होता. याशिवाय अंत्यसंस्कारालाही तो उपस्थित होता.
कृष्णा आंधळे हा अद्याप फरार
दरम्यान, यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार अशी त्यांची नावे आहेत. तर आज तिघांना अटक केली असून या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे.