अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात रोहित पवारांचे स्टेटमेंट नोंदवले; तपास सुरूच असल्याची CID ची भूमिका

विमान अपघात प्रकरणात आज महत्वाची घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि सीआयडी अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडली.

  • Written By: Published:
Untitled Design 112

Rohit Pawar’s statement recorded in the plane crash case : बारामती विमान अपघात प्रकरणात आज महत्वाची घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि सीआयडी अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान तपासाच्या सद्यस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी रोहित पवार यांना सविस्तर माहिती दिली.

सीआयडी अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान अपघाताबाबतचा अंतिम तांत्रिक अहवाल मिळवण्यासाठी विमान अपघात तपास यंत्रणा एएआयबीकडे अधिकृतरीत्या रिपोर्ट मागवण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक मुद्द्यांवर स्पष्टता येईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. सध्या सर्व संबंधित बाबींचा स्वतंत्र तपास सुरू असून एएआयबीच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

अजित पवार अपघात प्रकरणात CID ची एंट्री; DGCA ची VSR वर कारवाई; CID तपासात नवे पुरावे समोर

दरम्यान, रोहित पवार यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत मांडलेले सर्व मुद्दे आणि शंका त्यांनी लेखी स्वरूपात सीआयडीकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित कागदपत्रे आणि काही महत्वाचे पुरावे देखील त्यांनी तपास पथकाकडे सुपूर्द केले आहेत. या सर्व दस्तऐवजांची नोंद घेऊन त्यांचा तपासात समावेश करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

याच बैठकीदरम्यान रोहित पवार यांचा अधिकृत जबाब देखील सीआयडीकडून नोंदवण्यात आला. त्यांच्या निवेदनातील मुद्द्यांची पडताळणी केली जाणार असून, उपलब्ध पुरावे आणि एएआयबीचा अहवाल यांच्या आधारे पुढील दिशा ठरवली जाईल. सीआयडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपास सध्या सुरू असून कोणताही निष्कर्ष घाईत काढला जाणार नाही. सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबींचा बारकाईने अभ्यास करूनच पुढील कारवाई केली जाईल, असे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

follow us