भावाचा बदला घेण्यासाठी मंदार किवळेवर हल्ला, 2025 मधील शुभम चव्हाण प्रकरण काय?

Mangesh Kiwale Case : पुण्यातील शिवाजीनगर भागातील सत्र न्यायालयाबाहेर 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Mangesh Kiwale Case

Mangesh Kiwale Case : पुण्यातील शिवाजीनगर भागातील सत्र न्यायालयाबाहेर 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली आहे. सहा जणांच्या टोळक्याने न्यायालयाच्या परिसरात मंदार मारुती किवळे या तरुणावर गोळीबार केला मात्र टार्गेट चुकल्याने कोत्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्र न्यायालयासमोरील रस्त्यावर काल दुपारी 1.15 च्या सुमारास दोन दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. पिस्तुलातून मिस फायर झाल्यामुळे किवळेला गोली लागली नाही. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या जवळील असलेल्या कोयत्याने मंदार किवळेवर वार केले. या हल्ल्यात किवळे याचे दोन्ही हात जवळपास शरीरापासून वेगळे झाले. हल्ला केल्यानंतर तात्काळ हल्लेखोरांनी घटनास्थाळावरुन पळ काढला. एक वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मंदार किवळेवर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शुभम चव्हाण प्रकरण काय?

कात्रज भागातील संतोष नगर येथील रहिवासी शुभम चव्हाण या तरुणाचा 2025 मध्ये खून करण्यात आला होता. मालमत्तेच्या वादातून शुभम चव्हाणची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. शुभम चव्हाण याचा या भागात एक रेस्टॉरंट सुद्धा होता. घराशेजारील जमिनीवरुन त्याचे अमर साकोरे नावाच्या तरुणासोबत वाद होता. त्यातूनच चौघा जणांनी शुभम चव्हाणवर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याचा जीव गेला. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली होती. या हत्यानंतर शुभमच्या हत्येचा बदला घेणार अशी शपथ शुभम चव्हाण याचा भाऊ आणि मित्र यांनी घेतली होती. शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार केवळे तुरुंगातून बाहेर येताच त्याच्यावर त्यांनी हल्ला करत जीव घेण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार केवळेवर हल्ला करण्यासाठी चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्लॅन बनवायाला सुरुवात केली होती. त्यांनी शुभमच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मंदार केवळेला संपवण्याचा डाव आखला. याच दरम्यान चार ते पाच दिवसांसाठी मंदार जामीनावर तुरुंगातून बाहेर आला आणि याची माहिती चव्हाण आणि त्याच्या सहकाऱ्यांना मिळाली. ही माहिती मिळताच आरोपींनी त्यांच्यावर ट्रॅप लावला. किवळे न्यायालीन कामकाजासाठी सत्र न्यायालयात येणार असल्याची माहिती आरोपींना मिळाली. या माहितीवरुन आरोपींनी केवळेवर जीवघेणा हल्ला केला. शुभमचा सख्ख्या भाऊ अक्षय चव्हाण यानेच संपूर्ण कट रचला. त्याने इतर आरोपींनना सुपारी दिली.

रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; महाराष्ट्र दौऱ्यातून चाचपणी? –

follow us