राज्यात 2000 मराठी शाळा बंद पडणार? विधानसभेत आकडेवारी देत CM फडणवीस स्पष्टच म्हणाले

Devendra Fadnavis On Marathi Schools : मराठी शाळांवरुन गेल्या काही दिवसांपासून विरोधक महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत

  • Written By: Published:
Devendra Fadnavis On Marathi Schools

Devendra Fadnavis On Marathi Schools : मराठी शाळांवरुन गेल्या काही दिवसांपासून विरोधक महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. महायुती सरकारच्या काळात 2000 मराठी शाळा बंद झाले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांनी शिक्षण मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी देत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, मराठी शाळा (Marathi Schools) बंद पडल्या पाहिजेत का? हा प्रश्न माझ्यासह सगळ्यांना पडला आहे. मराठी शाळेबाबत केवळ भावना असून उपयोग नाही तर कृती हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी इंजिनिअरिंग शिक्षणापासून सर्व शिक्षण मातृभाषेत घेण्याची तरतूद केली आहे. राज्यात 2000 मराठी शाळा बंद करणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे मात्र मला प्रश्न पडतो ही आकडेवारी कुठून येथे? राज्यात आज 84 टक्के मराठी मध्यमांच्या शाळा आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याची जी आकडेवारी आली ती कपोलकल्पित आहे असं विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुण्यात सळई डोक्यावर पडून कामगार महिलेचा मृत्यू; क्रेरेनचालक,ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

तर दुसरीकडे आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीवरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात हिंदी, इंग्रजी सक्तीची ही शिफारस ठाकरे सरकारच्या काळात करण्यात आली होती असं फडणवीस म्हणाले. तर आमच्या राज्यात फक्त मराठी सक्तीची असणार असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलेय.

follow us