VSR कंपनी मालक व्ही. के सिंगला सीआयडीकडून शाही पाहुणचार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar On V. K Singh : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी
Rohit Pawar On V. K Singh : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात व्हीएसआर कंपनी आणि कंपनीचे मालक रोहित सिंगवर अनेक गंभीर आरोप करत हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात आज माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी पुन्हा एकदा तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात तपास करणाऱ्या सीआयडीने (CID) काल पुण्यातील ऑफिसमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांनी चौकशीसाठी बोलवलं होतं मात्र यावेळी रोहित सिंगला शाही पाहुणचार देण्यात आला असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
माध्यमांशी बोलतान रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, आपल्याला अजितदादांना न्याय देता येईल. पण साधा एफआयआर जर महाराष्ट्रात होत नसेल. 2019 मध्ये घाटकोपरला जो काही विमानाचा अपघात झाला होता. तेव्हा तिथं भाजप नेते किरीट सोमय्य गेल्यानंतर एफआयआर दाखल करुन घेण्यात आला होता. त्या एफआयआर आणि या एफआयआरमध्ये काहीच फरक नाही. पण अजित पवार यांचा एफआयआर जर महाराष्ट्रात घेत नसतील तर याला आपण काय म्हणणार. मग जे सत्तेत आहेत त्यांच्यात काही तागद असेत तर निदान एफआयआर होण्यासाठी ताकद लावा. दिल्लीत जाऊन बड्या नेत्यांना भेटल्यास फायदा होईल असं यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले.
रोहित सिंहला शाही पाहुणचार?
अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला CID ने चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? याबाबतच आता शंका निर्माण झालीय. सकाळी 11 वाजता आल्यानंतर त्याची आठ तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला. रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली.. यामागं काय काळंबेरं आहे म्हणून काळे कारनामे करणाऱ्याला असं काळ्या काचेच्या गाडीतून सोडलं गेलं? पण कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी याप्रकरणी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही.
अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला #VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला CID ने चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? याबाबतच आता शंका निर्माण झालीय. सकाळी ११ वाजता आल्यानंतर त्याची आठ तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं पण…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 6, 2026
एकीकडं आमचा हक्क असूनही या अपघाताबाबत FIR पण नोंदवून घेतला जात नाही पण दुसरीकडं ज्याच्या विमानाने अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या व्ही. के. सिंगला मात्र कुणाच्या आशीर्वादाने VIP ट्रीटमेंट दिली जाते? याबाबतचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलीस अत्यंत चुकीची वागणूक देतात. अशा परिस्थितीत आतातरी अजितदादांसोबत काम केलेले आणि त्यांचे ‘विश्वासू’ सत्ताधारी आमदार जागे होतील का? असं देखील आमदार रोहित पवार म्हणाले.
नव्या ऑर्डर घेऊ नका, व्यवसायिक वापराचा सिलेंडर पुरवठा बंद; सरकारकडून डिलर्सना आदेश-
तर आज संध्याकाळी मी सीआयडी कार्यालयात जाणार असून माझ्याकडे जी काही कागदपत्रे आहेत मी त्यांना देणार आहे. त्याचबरोबर एएआयबीचा अहवाल आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करु असे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आज जाऊन आम्ही एफआयआर करणार आहेत की नाही याची विचारणा करणार आहोत असेही यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले.
