संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा अड्डा पुणे होता का?; बजरंग सोनावणेंच्या मनात वेगळाच संशय कल्लोळ

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा अड्डा पुणे होता का?; बजरंग सोनावणेंच्या मनात वेगळाच संशय कल्लोळ

Beed MP Bajrang Sonawane on Ajit Pawar : वाल्मिक कराडनं ज्या गाडीतून सरेंडर केलं त्या गाडीचा मालक अजित पवार मस्साजोगला आले त्यावेळी हजर होता, असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय. तसंच, दादांना देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न होता का? असा सवालही सोनवणे यांनी उपस्थित केलाय. (Ajit Pawar) वाल्मिक कराड सरेंडर करण्याआधी जी गाडी वापरली त्या गाडीचा मालक अजित पवार मस्साजोगमध्ये आले तेव्हा हजर होता असा दावा सोनवणे यांनी केला आहे.

लई अवघड हाय गड्या उमगाया बाप्पारं; मिटकरींची पोस्ट चर्चेत, वाल्मिक कराड अन् बजरंग सोनवणे एकत्र?

सीआयडीच्या नऊ नऊ पथकांच्या हाती न लागता २२ दिवसानंतर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीच्या ऑफिसमध्ये स्वतःहून आला आणि सरेंडर केलं. यावेळी ज्या गाडीने वाल्मिक कराड आला एमएस २३ बीजी २२३१ हीच ती गाडी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्ता शिवलिंग मोराळे यांची असून त्यांची पत्नी अनिता मोराळे यांच्या नावावर आहे. आता बजरंग सोनवणे जे म्हणतायेत की गाडीचा मालक अजित पवारांच्या दौऱ्यावेळी मसाजोगमध्ये हजर होता. त्यांचा रोख शिवलिंग मोराळेकडेच आहे पुरावा म्हणून पत्रकार परिषदेत त्यांनी फोटोही दाखवला.

ज्या बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये सीआयडी चौकशी सुरू असून तिथे बाहेरचे लोक येऊन वाल्मिक कराडला भेटतात अशी तक्रार संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली. केजमधल्या कोरेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळे यांचं नाव घेऊन धनंजय देशमुख यांनी चौकशीची मागणी बीडचे एसपी नवनीत कावत यांच्याकडे केली. मात्र, आपण वाल्मिक कराडला भेटायला गेले नव्हतो तर सीआयडीने बोलावल्याच तांदळे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube