अजित पवारांना अडकवण्याचा कराडचा प्लान होता का?, बजरंग सोनावणेंचा खळबळजनक दावा

अजित पवारांना अडकवण्याचा कराडचा प्लान होता का?, बजरंग सोनावणेंचा खळबळजनक दावा

Bajrang Sonawane on Ajit Pawar : संतोष देशमुख यांच्या हत्येला 20 पेक्षा जास्त दिवस उलटून गेले असून अद्यापह काही आरोपी फरार आहेत. सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत, पोलिसांकडून कसून शोध घेतला जात (Bajrang Sonawane) असूनही देशमुख यांचे मारेकरी आणि त्यामागचा मास्टरमाईंड कोण हे अद्यापही सापडलेलं नाही. दरम्यान, अजित पवार हे मस्साजोग येथे देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती असा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकताच केला होता.

ज्या गाडीतून वाल्मिक कराड CID कार्यालयात गेली ती गाडी अजित पवारांच्या; आव्हांडांचा मोठा दावा

आता त्यांनी याप्रकरणी आता आणखी एक नवा दावा केला आहे. अजित पवार यांना अडकवण्याचा वाल्मिक कराडचा प्लान असावा असा आरोप सोनावणे यांनी केला आहे. ताफ्यात गाडी टाकून अजित दादांना अडकवण्याचा त्यांचा कट असावा, असा आरोप सोनावणे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

काय म्हणाले बजरंग सोनवणे ?

माझा अजित पवारांवर कोणताही आरोप नाही, असे सोनावणे यांनी आधीच स्पष्ट केले. संतोष देशमुख यांचे जेवढे मारकेरी आहेत ते पकडले गेले पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे आणि यामागचा जो मास्टरमाईंड आहे त्यालाही फाशी झाली पाहिजे, हाच माझा फोकस आहे. अजूनही या प्रकरणातील 3 आरोपी फरार आहेत, त्यांना पकडून शिक्षा व्हावी एवढीच माझी मागणी आहे,असे ते म्हणाले.

अजित दादा 21 तारखेला आले होते, हा आरोपी ( कराड) ज्या गाडीने सरेंडर होण्यासाठी आला, त्याच गाडीचा मालक तिथे होता. ज्याच्या नावावर गाडी आहे, तो तिथे होता. माझ्याकडे फोटो आहेत, मी विनाकारण आरोप करत नाही. अजित दादांवर माझा कोणताही आरोप नाहीये. अजित पवारांना काही बोलण्याचा, त्यांना टार्गेट करण्याचा माझा हेतू नाहीये, त्यांच्याविषयी बोलण्याचं मला काहीच कारण नाही. मी ( या मुद्याचं) राजकारण करत नाहीये. पण देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीला जे सहकार्य करत आहेत, त्यांच्यावर माझा आरोप आहे. देशमुखांचे जे मारेकरी आहेत, जे या कटात आहे, त्यांना पकडा आणि फाशी द्या एवढंच माझं म्हणणं आहे, असा पुनरुच्चार सोनावणे यांनी केला.

मला प्रसिद्धी नको, मला हाव नाही

काल सोनावणेंनी आरोप केल्यानंतर बरीच खळबळ माजली होती. त्यांना प्रसिद्धी हवी यासाठी ते असे आरोप करत आहेत, असे म्हणत सरकारमधील नेत्यांनी त्यांच्यावरच टीका केली होती. मात्र बजरंग सोनवणे यांनी हे सर्व दावेही फेटाळून लावले. कोणी म्हणतं की मला प्रसिद्धी हवी म्हणून मी हे सगळं करतोय, पण स्पष्ट सांगतो, मला प्रसिद्धी नकोय. बीड जिल्ह्याच्या जनतेने मला खासदार करून मला खूप प्रसिग्ध केलंय, त्यामुळे मला आणखी प्रसिद्धी नकोय. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे, देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे, माझा हेतू आहे, असे सोनावणे यांनी स्पष्ट केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube