राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादा पक्षाचे ‘बॉस’ होणार होते; शिंदेंच्या दाव्यानं नवं वळण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल
Shashikant Shinde On Both NCP Merger : विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता.” या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी साप्ताहिकातील अध्यक्षीय लेखात हा उल्लेख केला आहे.
…त्यामुळे अमित शाहांनी अजितदादांच्या अपघाताबाबत वेळ दिली नसावी; रोहित पवारांनी सांगितलं कारण
साप्ताहिकात नेमकं काय म्हणालेत शिंदे?
अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची कल्पना आणि जाणीव आहे. परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरूस्त करायची या विचाराने दादा मागील 4 ते 5 महिन्यांपासून मागे लागले होते. महापिलिका, जि.परिषदेत जाणीवपूर्वक युती घडवून आणली होती आणि दादा स्वतः हिरीरीने प्रचाराची आघाडी सांभाळीत होते. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत झाला होता. Shashikant Shinde On Both NCP Merger
विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णयही शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केला होता. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवारांच्या दाव्याला हिंदुरावांचा दुजोरा; शेवटच्या क्षणी का घेतला विमान प्रवासाचा निर्णय?
पवारांच्या निवास्थानी पार पडली होती बैठक
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर एकीकडे शरद पवार गटाकडून दावा केला जात असताना, दुसरीकडे मात्र, दादांच्या राष्ट्रवादीतील नेते पवारांच्या बंगल्यावर झालेली बैठक ही जिल्हा परिषद निवडणुका आणि महापालिका एकत्रित लढवण्याबाबत झाल्याचे सांगत आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता असे सांगत खळबळजनक दावा केला आहे.
विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तटकरे काय म्हणाले?
