Shashikant Shinde : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत वाद? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेवर गंभीर आरोप
Shashikant Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देत भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राज्यातील राजकीय
Shashikant Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देत भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. सोमवारी खासदार सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदी यांना 8 खासदारांसह दिल्लीत भेटणार आहे. मात्र या भेटीत शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांच्याकडून देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मुंबई विभागीय महिला अध्यक्षपदावरुन अंतर्गत सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात शरद पवार यांना पत्र लिहून प्रदेशध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याविरोधात तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या नवीन नियुक्तीला विरोध करण्यात आले आहे. तसेच पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना देखील या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच सध्याच्या मुंबई महिला अध्यक्ष प्रिया बांदिवडेकर यांना हटवून मुलुंड तालुकाध्यक्ष संगीता वाजे यांची नियुक्ती करण्यासाठी शशिकांत शिंदे आग्रही असल्याचा आरोप देखील या पत्रात करण्यात आला आहे. महिला पदाधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना आणि कोणाचेही मत न घेत शशिकांत शिंदे हा बदल करत असल्याचा दावा देखील या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार या पत्रावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Gen Z ची दिशाभूल करण्यात आली; राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले धर्मेंद्र प्रधान
तर दुसरीकडे आरोप करणाऱ्या पत्रावर मुंबईत आयोजित पक्षाची बैठकीत माहिती घेणार असून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपसोबत जाणार? सुप्रिया सुळे 8 खासदारांसह PM मोदींना भेटणार-