Video : अजितदादांबद्दलची मुंबईत न सांगितलेली गोष्ट रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन सांगितली…

दादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Written By: Published:
Video : अजितदादांबद्दलची मुंबईत न सांगितलेली गोष्ट रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन सांगितली...

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर आमदार आणि दादांचे पुतणे रोहित पवारांनी काल (दि.10) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या. त्यानंतर आज (दि.11) त्यांनी दिल्लीतही पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. काल मुंबईतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी एका गोष्टीचा खुलासा केला नव्हता त्याबाबत त्यांनी दिल्लीत माहिती दिली आहे. रोहित पवारांच्या या विधानानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Video : रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघाताची पुराव्यासह वाईट वेळ सांगितली

नेमकं रोहित पवारांनी काय सांगितलं?

दादांचा ज्यावेळी विमान अपघात झाला त्यावेळी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये दादांचा मृतदेह मोठ्या प्रमाणात फुगल्याचं दिसून येत होतं. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर आम्ही डॉक्टरांशी बोललो. दादांची बॉडी स्वेल (फुगली) होती. आगीत भाजून मृत्यूमुखी पडल्यावर बॉडी स्वेल होते का? असं आम्ही डॉक्टरांना विचारलं होतं. त्यावर डॉक्टर हो म्हणाले. पण दादांची बॉडी अॅबनॉर्मली (Abnormally Swollen) अधिक स्वेल झाली होती, असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, दादांची बॉडी इतकी का सुजलेली होती, ते पाहणंही महत्त्वाचं आहे, असे रोहित पवार म्हणाले. यामुळे आता अजित पवारांसोबत नेमकं काय घडलं? याचं गूढ वाढतच चाललं असल्याचं चित्र आहे. Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash

विमान कोसळणार असेल म्हणूनच…

विमान अपघाताच्या काही क्षण आधी सहवैमानिक असलेल्या कॅप्टन शांभवी पाठक यांच्या संवादाची एक क्लिप समोर आली होती. यामध्ये त्या, ‘ओह शीट… ओह शीट बोलताना ऐकू येत आहे. त्यांना आता आपले विमान कोसळणार याचा अंदाज आल्यामुळंच त्या तसं बोलल्या असाव्यात, असा तर्क रोहित पवार यांनी मांडला आहे. विमान खूप खाली आल्यानंतर स्टॉल वॉर्निंग सिस्टीम सुरु होतं. पण स्टॉल वॉर्निंग सिस्टीम बंद असावी. मात्र, विमान खूप खाली आल्यानंतर आता ते कोसळणार, याचा अंदाज कॅप्टन शांभवी पाठक यांना आला असेल. जो माणूस जीवाची पर्वा करतो, तशीच प्रतिक्रिया कॅप्टन शांभवी पाठक यांच्याकडून आली. त्यामुळं त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये ‘ओह शीट… ओह शीट’ बोलताना ऐकू येत आहे. यानंतर 9 ते 10 सेकंदात विमान खाली कोसळलं. आमचा कॅप्टन शांभवी पाठक यांच्यावर कोणताही आक्षेप नाही. आमचा आक्षेप मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्यावर आहे, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

लॅंडिंग आधी अजितदादांनी केला होता फोन; अखेरच्या कॉलमध्ये काटेवाडीच्या पवारांना काय म्हणाले?

रोहित पवारांच्या शंकांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, विमान अपघातासंदर्भात जी काही चौकशी सुरू आहे ती, पूर्ण न होता, आपण जर वेगवेगळे तर्क-वितर्क लावले, तर त्यासंदर्भात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. दादांच्या अपघाताची पूर्ण, सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे, ही रोहित पवारांची मागणी काही चुकीची नसल्याचे फडणवीस म्हणाले.

भारतातल्या चौकशी यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत, अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडून चौकशीसाठी लोक बोलावले जातात. त्यामुळे भारतातील चौकशी यंत्रणांवर कोणीही अविश्वास दाखवू नये. ब्लकबॉक्सही सापडलेला असून, भावनेच्या भरात कदाचित रोहित पवार असं बोलले असतील, पण आपल्याच देशातल्या एजन्सीवर आपण अशाप्रकारे कधी अविश्वास दाखवत नाही त्यामुळे या ठिकाणीही दाखवण्याचं कारण नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी रोहित पवारांच्या उपस्थित केलेल्या शंकांवर दिली आहे.

अजितदादा पवार आपल्या महाराष्ट्राचं लाडकं आणि वरिष्ठ नेतृत्व होतं

अजितदादा पवार हे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं आणि वरिष्ठ नेतृत्व होतं त्यामुळे या अपघातीची सखोल चौकशी व्हावी ही मागणी पहिल्यांदा मी स्वतः केलेली. आपल्याला कल्पना असेल तर मी केंद्र सरकारला कल्पना देऊन, या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी, असं सांगितलं होतं, त्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करुन त्यासंदर्भातलं पत्रही मला पाठवलं आहे… आता सध्या चौकशी सुरू असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

follow us