गोकुळ ताब्यात घेण्याचा डाव म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’; रोहित पवारांचा हल्लाबोल
Rohit Pawar On Gokul Election : कोल्हापुरातील दूध उत्पादक संघ गोकुळच्या अध्यक्षपदावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
Rohit Pawar On Gokul Election : कोल्हापुरातील दूध उत्पादक संघ गोकुळच्या अध्यक्षपदावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. गोकुळसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या समविचार आघाडीला बहुमत मिळाले आहे मात्र आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत गोकुळ दूध संघावर 4 शासननियुक्त तज्ज्ञ संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गोकुळ दूध संघावर पुन्हा एकदा महायुतीची सरकार येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील आक्रमक झाले असून कायदेशीर लढाई लढण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि नेते रोहित पवार यांनी देखील या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
गोकुळ दूध संघ निकालाच्या (Gokul Election) दिवशी कोल्हापुरात (Kolhapur) असून देखील मिरवणूक काढता आली नाही म्हणून ईगो दुखावला असेल तर मग काय शासकीय सदस्य नेमून लोकमताशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार का? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच ‘गोकुळ’च्या निवडणुकीत साडेपाच लाख सभासदांनी दिलेलं जनमत बाजूला सारून शासकीय सदस्य नेमत गोकुळ ताब्यात घेण्याचा डाव म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असंच म्हणावं लागेल असं देखील रोहित पवार म्हणाले. एक्सवर त्यांनी पोस्ट करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
या पोस्टमध्ये रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, ‘गोकुळ’ च्या निवडणुकीत साडेपाच लाख सभासदांनी दिलेलं जनमत बाजूला सारून शासकीय सदस्य नेमत गोकुळ ताब्यात घेण्याचा डाव म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असंच म्हणावं लागेल. निकालाच्या दिवशी कोल्हापुरात राहून मिरवणूक काढता आली नाही म्हणून ईगो दुखावला असेल तर मग काय शासकीय सदस्य नेमून लोकमताशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार का? सरकारच्या हा निर्णय म्हणजे अराजकता आहे.
गोकुळचा विषय केवळ बंटी पाटील (Satej Patil) आणि कोल्हापूरपुरता मर्यादित नाही, तर लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. आज गोकुळमध्ये रडीचा डाव केला उद्या लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यावर रडीचा डाव खेळतील. त्यामुळं हे असले विषारी साप आताच ठेचले पाहिजेत. ज्या दिवशी अध्यक्ष निवड राहील त्यादिवशी संपूर्ण लोकशाही प्रेमी संविधान प्रेमी नागरिकांनी गोकुळला घेराव घालून जनमताची ताकद मुंबईपासून दिल्लीपर्यंत दाखवून द्यायला हवी. गोकुळचे सभासद आणि बंटी पाटलांसोबत संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे असं रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत साडेपाच लाख सभासदांनी दिलेलं जनमत बाजूला सारून शासकीय सदस्य नेमत गोकुळ ताब्यात घेण्याचा डाव म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असंच म्हणावं लागेल.
निकालाच्या दिवशी कोल्हापुरात राहून मिरवणूक काढता आली नाही म्हणून ईगो दुखावला असेल तर मग काय शासकीय सदस्य नेमून लोकमताशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार का? सरकारच्या हा निर्णय म्हणजे अराजकता आहे.
गोकुळचा विषय केवळ बंटी पाटील आणि कोल्हापूरपुरता मर्यादित नाही, तर लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. आज गोकुळमध्ये रडीचा डाव केला उद्या लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यावर रडीचा डाव खेळतील. त्यामुळं हे असले विषारी साप आताच ठेचले पाहिजेत. ज्या दिवशी अध्यक्ष निवड राहील त्यादिवशी संपूर्ण लोकशाही प्रेमी संविधान प्रेमी नागरिकांनी गोकुळला घेराव घालून जनमताची ताकद मुंबईपासून दिल्लीपर्यंत दाखवून द्यायला हवी. गोकुळचे सभासद आणि बंटी पाटलांसोबत संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे.
#गोकुळ #SaveGokul #गोकुळ_वाचवा #कोल्हापूर
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 5, 2026
अखिल भारतीय संत समितीसह गंगा महासभेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ‘सनातन मार्तंड’ पुरस्कार-